MP Supriya Sule यांनी PM Narendra Modi कडून शरद पवारांवर शेती क्षेत्रातील सुधारणांबाबत घेतलेल्या 'यू टर्न' वरील टीकेला पुराव्यानिशी खोडलं; पहा काय म्हणाल्या (Video)
PM Narendra Modi and MP Supriya Sule| Photo Credits:: Screen grab Youtube Channel YOYO TV Channel

भारतामध्ये मागील 70-75 दिवसांपेक्षा जास्त काळापासून शेतकरी आंदोलन आणि नवे कृषी कायदे हा विषय पेटत आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येही त्याचे पडसाद पहायला मिळाले आहेत. राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलताना राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी युपीए सरकारच्या काळात शरद पवार (Sharad Pawar) यांनी कृषीमंत्री असताना कृषी क्षेत्रातील सुधारणांना पाठिंबा दिला होता मात्र आता त्यांच्यासह सारेच विरोधक नव्या कृषी कायद्यांचा विरोध करत आहे यावरून टीकास्त्र डागलं होतं. त्यासाठी लोकसभेत पंतप्रधानांनी शरद पवारांनी राज्यांना धाडलेल्या पत्रातील काही भाग वाचून दाखवला. पण त्यांनी काही भाग वाचणं टाळल्याचं सांगत शरद पवारांनी राज्यांना त्यांच्या सोयीनुसार एपीएमसी मार्केटच्या सुधारणांविषयी अंमलबजावणीची मुभा असल्याचं पत्रात लिहल्याचं खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी म्हटलं आहे. Rohit Pawar Slams BJP: 'त्या' पत्रावरुन शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपला रोहीत पवार यांचे प्रत्युत्तर.

दरम्यान सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्या शेती क्षेत्रातील सुधारणांच्या बाबतीत शरद पवारांच्या यु टर्नचा मुद्दा खोडून काढतानाच भाजपा सरकारने अनेक विषयांवर बदललेल्या भूमिकांचा देखील समाचार घेतला आहे. तसेच पंतप्रधानांनी त्यांच्या भाषाणात इंटेट आणि कंटेट या शब्दावरून उडवलेल्या खिल्लीचं उत्तर देताना जर भाजपा सरकारने केलं तर ते इंटेट आणि कंटेट आणि आम्ही केलं तर यु टर्न असं कसं होऊ शकतं? असं म्हटलं आहे. कायद्यांमध्ये बदल केले जाऊ शकतात. काळानुरूप ते गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत बोलत असतानाच त्यांना थांबवून हा मुद्दा खोडता आला असता पण तसं करणं आमची संस्कृती नाही. तसेच मला शरद पवारांना डिफेंड करण्याची देखील गरज नाही. ते त्यासाठी समर्थ आहेत. मात्र मला काही गोष्टी सभागृहासमोर मांडायच्या होत्या कारण त्याचा उल्लेख पंतप्रधानांनी भाषणात केला असल्याचं देखील सुप्रिया सुळे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे. (हेही वाचा, PM Narendra Modi On Farm Laws: कृषी क्षेत्रात सुधारणांना शरद पवार यांच्या सह कॉंग्रेसचा एकेकाळी पाठिंबा मग आता यु टर्न का? विरोधकांवर हल्लाबोल करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत नव्या कृषी कायद्यांवर सोडलं मौन!).

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 

सुप्रिया सुळे यांनी यावेळेस लोकसभेत बोलताना कोविड 19 मोफत लस देण्याबाबत बोलतानाच केंद्राकडे महाराष्ट्राचे थकीत असलेले जीएसटीच्या माध्यमातील पैसे याबद्दलही विचारणा केली आहे. यावेळी त्यांनी जर केंद्राने वेळीच जीएसटीचे महाराष्ट्राचे पैसे पूर्ण परत केल्यास आम्ही महाराष्ट्रात मोफत कोविड 19 लसीकरण करू शकतो असं म्हटलं आहे. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे केंद्राकडे 26590 कोटी रूपये थकीत आहेत.