नागालॅन्ड (Nagaland) मध्ये भाजपा (BJP) युतीचा प्रवास सत्तास्थापनेच्या दिशेने सुरू झाला आहे. दरम्यान नागलॅन्ड पहिल्यांदाच रामदास आठवले यांच्या आरपीआयने विजयाचा झेंडा फडकवला आहे. त्यांचे दोन आमदार विधानसभेत निवडून आले आहे. या विजयी कामगिरीनंतर आनंद व्यक्त करत अभिनंदन करताना त्यांने एक मोठं वक्तव्य देखील केले आहे.
रामदास आठवले यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये, 'नागालॅंड मध्ये माझ्यापक्षाचे 2 आमदार जिंकले आहेत. जर अजून आमदार जिंकून आले तर आमच्या पक्षाचा NDA ला पाठिंबा असेल आणि रिपब्लिकन पार्टी सत्तेमध्येही सहभागी होण्यासाठी दावा करेल. आपण स्वतः भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा आणि जनरल सेक्रेटरी संतोष यांच्यासोबत बोलणी करून आरपीआय सोबत सत्तेमध्ये सहभागी होणार आहे'.Nagaland Assembly Elections Result 2023: रामदास आठवले यांच्या Republican Party of India (Athawale) पक्षाला नागालँडमध्ये यश, थेट जिंकल्या 2 जागा
आरपीआय चे Imtichoba हे Tuensand Sadar- II मधून विजयी ठरले आहेत. नोकसेन विधानसभा मतदारसंघातून वाय. लिमा ओनेन चँग विजयी झाले आहेत.
नागालँडमध्ये भाजपा आणि नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी (NDPP) यांची युती आहे. भाजपाने 60 पैकी फक्त 20 जागांवर तर उर्वरित 40 जागांवर एनडीपीपीने निवडणूक लढली आहे.