Nagaland Assembly Elections Result 2023: रामदास आठवले यांच्या Republican Party of India (Athawale) पक्षाला नागालँडमध्ये यश, थेट जिंकल्या 2 जागा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या पक्षाला महाराष्ट्र विधानसभेत भलेही एकही जागा नाही. पण, असे असले तरी नागालँड विधानसभा निवडणुकीत (Nagaland Assembly Elections Result 2023) मात्र रामदास आठवले यांच्या पक्षाला मात्र दमदार यश मिळाले आहे. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले) (Athawale Republican Party of India (Athawale) दोन जागा जिंकल्या आहेत.

Nagaland Assembly Elections Result 2023: रामदास आठवले यांच्या Republican Party of India (Athawale) पक्षाला नागालँडमध्ये यश, थेट जिंकल्या 2 जागा
Ramdas Athawale | (Photo Credit : Facebook)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या पक्षाला महाराष्ट्र विधानसभेत भलेही एकही जागा नाही. पण, असे असले तरी नागालँड विधानसभा निवडणुकीत (Nagaland Assembly Elections Result 2023) मात्र रामदास आठवले यांच्या पक्षाला मात्र दमदार यश मिळाले आहे. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले) (Athawale Republican Party of India (Athawale) दोन जागा जिंकल्या आहेत. स्वत: रामदास आठवले यांनी ही माहिती दिली आहे.

रामदास आठवले यांनी माहिती देताना सांगितले की, नागालँड विधानसभा निवडणूक 2023 मध्ये त्यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले) दोन जागा जिंकल्या आहेत. तसेच, NDPP 1 जागा जिंकून 25 जागांवर आघाडीवर आहे. भाजपने 2 जागा जिंकल्या आहेत आणि 12 जागांवर आघाडीवर आहे. यासोबतच लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) 3 जागांवर आघाडीवर आहे. (हेही वाचा, Kasba Assembly Election Result 2023: बालेकिल्ल्यात भाजप चारीमुंड्या चीत; रविंद्र धंगेकर विजयी, भाजपचे हेमंत रासने पराभूत, CM एकनाथ शिंदे, डीसीएम देवेंद्र फडणवीस यांना धक्का)

ट्विट

नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 60 जागांपैकी 59 जागांसाठी निवडणूक झाली. उर्वरीत एक मतदार संघ असलेल्या अकुलुतोमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) बिनविरोध जिंकला आहे. दरम्यान, नागालँडमध्येराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही 6 उमेदवार आघाडीवर होते. नागालँड विधानसभेचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. कोणता पक्ष किती मतांनी जिंकला आणि सत्तेत कोण बसणार याबाबत लवकर स्पष्टता येणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 02, 2023 02:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).