PM Narendr Modi (Photo Credits: Getty Image)

केंद्रात मोदी सरकार मध्ये लवकरच मोठे बदल अपेक्षित आहेत. 30 मे 2019 ला झालेल्या शपथविधीनंतर कॅबिनेट मध्ये कोणतेच बदल किंवा खांदेपालट करण्यात आले नव्हते त्यामुळे आता काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहेत. दरम्यान येत्या 1-2 दिवसांत मोदी सरकार त्यांच्या कॅबिनेटचा विस्तार करण्याची शक्यता आहे. यामध्ये देशभरातील अनेक महत्त्वाची नावं चर्चेमध्ये आहेत. महाराष्ट्रातून नारायण राणे(Narayan Rane), हीना गावित (Heena Gavit) यांचं नाव चर्चेत आहे तर कॉंग्रेस मधून भाजपा मध्ये आलेले ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांचं नाव देखील या यादीत असल्याची चर्चा आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी देखील या आगामी कॅबिनेट विस्ताराबाबत चर्चा झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात 81 सदस्यांसाठी एकूण जागा आहे. त्यामध्ये सध्या 53 मंत्री आहेत. याचा अर्थ अजूनही 28 जणांना मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळू शकते. त्यामुळे मागील काही महिन्यांत भाजपा मध्ये आलेल्या काही मोठ्या नावांची चर्चा आहे. मध्य प्रदेशात कमलनाथांचे सरकार पाडत तब्बल 2 डझन आमदारांना आपल्यासोबत आणणार्‍या ज्योतिरादित्य सिंधिया यांना देखील या मंत्रिमंडळ विस्ताराच्यारूपाने भेट मिळू शकते. तर आजच जाहीर झालेल्या नव्या राज्यपालांच्या यादीमध्ये मंत्री Thawarchand Gehlot यांचं नाव आहे. ते आता मंत्रीपदावरून पायाउतार होत राज्यपाल झाले आहेत.

महाराष्ट्रातून नारायण राणेंचाही समावेश आहे. त्यांच्यादेखील नावाची चर्चा आहे. सध्या ते दिल्लीत दाखल झाले आहेत. मात्र कॅबिनेट सहभाग होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी शिताफीने बोलणं टाळत अद्याप फोन आलेला नाही पण काही झालंच तर ते तुम्हांला (मीडीयाला) कळल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत त्यांनी आशा कायम ठेवली आहे.

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूका आहेत. हेच लक्षात घेता आता तेथे भाजपाला साथ देणार्‍या अपना दलच्या अनुप्रिया पटेलची देखील कॅबिनेट मध्ये वर्णी लागू शकते. त्या मोदी सराकारच्या पहिल्या कॅबिनेट मध्ये सहभागी होत्या नंतर त्यांना डावलण्यात आले होते. आसामचे माजी मुख्यमंत्री Sarbananda Sonowal यांच्यादेखील नावाची चर्चा आहे.

राज्यसभा सदस्य सुशील कुमार मोदी देखील आशादायी आहेत. बिहारचे उपमुख्य मंत्री म्हणून काम केले आहे. त्यांना बिहार मध्ये नितिश कुमार यांच्या सरकार मध्ये कोणतेच पद मिळालेले नाही.

रामविलास पासवान यांचे बंधू पशुपती पारस देखील चर्चेमध्ये आहेत. त्यांनी चिराग पासवान यांच्या विरूद्ध उभं राहण्याचं धाडस दाखवलं होतं. या सोबत आरसीपी सिंह आणि लल्लन सिंह यांचि नावं चर्चेमध्ये आहेत.

मीडीया रिपोर्ट्समध्ये उत्तर प्रदेशातील आगामी निवडणूका पाहता तेथून देखील अनेक नावं चर्चेमध्ये असू शकतात. भाजपा नेते वरूण गांधी, रिता बहुगुणा जोशी दिल्लीमध्य दाखल झालेले आहेत.