
Maharashtra Zilla Parishad Election Results 2020: राज्यात नागपूर (Nagpur) , धुळे (Dhule), पालघर (Palghar), नंदुरबार (Nandurbar), अकोला (Akola) आणि वाशिम (Washim) अशा एकूण सहा जिल्हा परिषदांचे निवडणूक निकाल आज (8 जानेवारी 2019) जाहीर झाले. सकाळी 10 वाजलेपासून सुरु झालेली ही मतमोजणी जवळपास पूर्ण होत आली असून, सर्वच्या सर्व जिल्हा परिषदांचे निकाल हाती आले आहेत. हाती आलेल्या निकालांवर नजर टाकता काही ठिकाणी राज्यात महाविकासआघाडी पॅटर्न यशस्वी ठरत असून, हा पॅटर्न भाजपला धोबीपछाड देत असताना दिसतो आहे. तर, काही ठिकाणी एकटा भाजप शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला भारी पडताना दिसत आहे. लोकसभा निवडणूक 2019 आणि विधानसभा निवडणूक 2019 मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलेल्या वंचित बहुजन आघाडी एखाद्या ठिकाणी चांगली कामगिरी करताना दिसत आहे. नजर टाकूया सर्वच्या सर्व सहा जिल्हा परिषद निकालांवर.
पालघर जिल्हा परिषद निकाल :
एकूण ५७ जागा
शिवसेना : १८, माकपा : ५, भाजप : ११,राष्ट्रवादी : १६, काँग्रेस : १, बविआ : ४, मनसे : ०
अपक्ष : २
अकोला जिल्हा परिषद निकाल:
एकूण ५३ जागा
शिवसेना - ११, भारिप - १९, भाजप - ५, राष्ट्रवादी - ३, काँग्रेस - ३, अपक्ष - ४
नंदुरबार जिल्हा परिषद निकाल - ५६ जागा
काँग्रेस २३, भाजपा २३, शिवसेना ७, राष्ट्रवादी ३, अपक्ष - 00
नागपूर जिल्हा परिषद निकाल - जागा
एकूण जागा - ५८
काँग्रेस - ३०, राष्ट्रवादी - १०, भाजप - १५, शेकाप - ०१, शिवसेना - ०१, अपक्ष - ०१
वाशिम जिल्हा परिषद
भाजप - ७, शिवसेना - ७, वंचित - ९, राष्ट्रवादी - १०, काँग्रेस - ९, अपक्ष - २, जिल्हा जनविकास आघाडी - ७, स्वाभिमानी शेतकरी - १
धुळे जिल्हा परिषद निकाल -
एकूण ५५ (१ निकाल राखीव)
भाजप - ३८, काँग्रेस - ४, शिवसेना - ३, राष्ट्रवादी काँग्रेस - ०, अपक्ष - १, एका जागेचा निकाल राखुन ठेवण्यात आला आहे. (हेही वाचा, महाविकाआघाडीचा 'ख्वाडा' सोडवताना देवेंद्र फडणवीस घरच्या मैदानावर चितपट; नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप पराभूत)
पंचायत समिती निवडणूक निकाल
अकोला पंचायत समिती निकाल -
एकूण २० जागा
भारिप - १०, शिवसेना - ४, राष्ट्रवादी - १, भाजप - ३, काँग्रेस - ०, अपक्ष - २
मूर्तिजापूर पंचायत समिती निकाल -
एकूण १४ जागा
भारिप - ६, शिवसेना - २, राष्ट्रवादी - ३, काँग्रेस - ३
धुळे - शिंदखेडा पंचायत समिती
एकूण २० जागा
भाजप - १५, शिवसेना - २, काँग्रेस - १, राष्ट्रवादी - १, अपक्ष - १
आज जाहीर होणाऱ्या जिल्हा परिषद निकालांकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात घडलेले राजकीय नाट्य आणि आकारास आलेली महाविकाआघाडी, एकाकी पडलेला भाजप, सत्ता आणि संघटना विस्तारात चाचपडत असलेला मनसे, अपयशी ठरुनही चर्चेत राहिलेली वंचित बहूजन आघाडी, तसेच डाव्या पक्षांची कामगिरी अशा सर्व बाबींची किनार या निवडणुकीला होती. अखेर जनतेने आपला कौल दिला असून बरीच उत्सुकता संपली आहे. मात्र, या निकालानंतर अनेक राजकीय प्रश्न नव्याने जन्माला आले असून, येत्या काळात त्याची उत्तरे कोणत्या स्वरुपात मिळणार याबाबत नवी उत्सुकता निर्मण झाली आहे.