कमलेश तिवारी (Photo Credit-Facebook)

उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौ मध्ये हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष कमलेश तिवारी (Kamlesh Tiwari) यांची शुक्रवारी यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, कमलेश तिवारी यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्या. ही घटना नाका थाना क्षेत्रात घडली असून हत्या केल्यानंतर अज्ञातांनी घटनास्थळावरुन पळ काढला. घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेत त्याबाबक अधिक तपास करण्यात येत आहे. कमलेश तिवारी यांची प्रकृती असल्या दरम्यान रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळावरुन रिवॉल्वर जप्त केल्या आहेत. तर आता या प्रकरणाचा अधिक तपास केला जात असून कमलेश तिवारी यांना गंभीर प्रकृतीतच ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याने ताब्यात घेतले होते. सध्या त्यांची सुटका करण्यात आली आहे.