PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वाराणसी (Varanasi) येथून लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections 2019) उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी प्रतिज्ञापत्राचे वाचन केले. तसंच अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी काशी येथील काळभैरवाचे दर्शन घेतले. (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसी येथून प्रियांका गांधी नाही तर अजय राय टक्कर देणार)

ANI ट्विट:

पंतप्रधान मोदी उमेदवारी अर्ज दाखल करत असताना त्या ठिकाणी भाजप, एनडीएचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. भाजप नेत्या सुषमा स्वराज, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पियुष गोयल, जे. पी. नड्डा, नितीन गडकरी उपस्थित होते. निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी एक दिवस मोदींनी वाराणसी येथे भव्य रोड शो करत वाराणसी येथील आपल्या प्रचाराला सुरुवात केली.

2014 मध्ये देखील पंतप्रधान मोदींनी वाराणसी मतदारासंघात निवडणूक लढवत आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा तीन लाख मतांनी पराभव केला होता.