लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) सात टप्प्यातील मतदान 19 मे रोजी पार पडले. मात्र सातव्या टप्प्यातील मतदानावेळी काही ठिकाणी हिंसा घडवून आणला गेल्याचा प्रकार दिसून आला. त्यामुळे केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांची निवडणूक आयोगासोबत (Election Commission) याबद्दल बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे हिंसा झालेल्या ठिकाणी पुन्हा फेरमतदान व्हावे अशी मागणी गोयल यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
तनरतारन येथे झालेल्या चकमकीत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून त्यामध्ये अनेक जण जखमी झाले. तसेच हिंचासाराच्या घटना या सर्वाधिक पश्चिम बंगाल येथे झाला असल्याचे सुद्धा गोयल यांनी म्हटले आहे. त्यामुळे बूथवर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकारामुळे येथे पुन्हा मतदान व्हावे अशी मागणी गोयल यांनी केली असून निवडणूक आयोग आता कोणती भुमिका बजावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (अबब! सट्टाबाजारात नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यावर लागले इतके दर; जाणून घ्या कोणाला आहे पसंती)
BJP requests EC to conduct repolling in booths affected by violence in the Lok Sabha polls
Read @ANI Story | https://t.co/PL04z0CXtG pic.twitter.com/56wkV6EZYC
— ANI Digital (@ani_digital) May 20, 2019
तर भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी सुद्धा पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने हिंसाचाराच्या घटना घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये अधिक वाढ झाल्याचे ही बोलले जात आहे.