![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/05/Rahul-gandhi-Narendra-modi-1-784x441-380x214.jpg)
अखेर लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections) शेवटच्या टप्प्यात पोहचल्या आहेत. आज सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी मतदान सुरु आहे. संध्याकाळी 6.30 नंतर एक्झिट पोल बाहेर पडतील. त्यानंतर प्रतीक्षा असेल ती निकालाची, जो 23 मे रोजी लागणार आहे. त्याआधी या निवडणूक निकालामुळे सट्टाबाजारात (Satta Bazar)मोठी तेजी आली आहे. देशाचा नवीन पंतप्रधान कोण होईल यावर सट्टाबाजाराने मोठा गल्ला जमवला आहे. यावेळी सट्टाबाजारातील भविष्यवाणीनुसार पुन्हा एकदा 220 जागा जिंकत नरेंद्र मोदी सत्तेवर येतील. तर कॉंग्रेसकडे 100 जागा राहतील.
असा चालला आहे दर –
21 जागांसाठी - 27 पैसे
22 जागांसाठी - 60 पैसे
23 जागांसाठी - 1 पैसे
24 जागांसाठी - एक रुपया
80 पैशाच्या बदल्यात 2 रुपये 20 पैसे तर गुजरातमधील 26 जागांसाठी, 7 पैशाच्या बदल्यात 8 रुपये 50 दर लावण्यात आला आहे. पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदी यांच्यावर 14 पैसे आणि राहुल गांधी यांच्यावर 5 रुपये असा दर चालू आहे. गुजरातच्या ऊंझा, मेहसाणा, अहमदाबाद, राजकोट आणि सुरत या पाच शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. (हेही वाचा: निवडणूकीच्या निकालावर 12,000 करोड रुपयांचा सट्टा, जाणून घ्या निवडणूकीच्या रणधुमाळीतील सट्टा बाजाराचे स्वरुप)
2014 सालच्या निवडणुकांवेळी गुजरातमध्ये 500 कोटींचा सट्टा लागला होता, यावर्षी देशातील विविध ठिकाणी कॉंग्रेसने भाजपसाठी कडवे आव्हान उभे केल्याने 200 कोटींपेक्षा कमीचा सट्टा लागला आहे. मात्र पसंती पंतप्रधान म्हणून पसंती नरेंद मोदी यांनाच मिळत आहे.