Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक पहिला टप्पा - कोणत्या राज्यात किती टक्के मतदान? घ्या जाणून
Lok Sabha Elections 2019 First Phase Voting | (Photo Credits: ANI/Twitter)

Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक 20196 साठी होणाऱ्या मतदानाचा पहिला टप्पा (First Phase Voting) गुरुवारी (11 एप्रिल 2019) पार पडला. पहिल्या टप्प्यासाठी एकूण 20 राज्यांतील काही मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, महाराष्ट्र, असम, ओडिसा, जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपूरा, सिक्किम, अंदमान-निकोबार- लक्षद्वीप या राज्यांचा समावेश आहे. काही अपवाद वगळता पहिल्या टप्प्यासाठी मतदान शांततेत पार पडले. जाणून घ्या कोणत्या राज्यात किती टक्के मतदान पार पडले.

हाती आलेल्या माहितीनुसार मतदानाची टक्केवारी खालील तक्त्यानुसार (आकडेवारीत बदल शक्य)

लोकसभा निवडणूक 2019: पहिला टप्पा मतदान सरासरी टक्केवारी (आकडेवारीत बदल शक्य)
राज्य मतदारसंघ संख्या मतदानाची टक्केवारी
महाराष्ट्र 7 55
उत्तर प्रदेश 8 59.77%
उत्तराखंड 5 57.85%
बिहार 4 50.26%
असम 5 68 %
उडीसा 4  
जम्मू काश्मीर 2 54.49%
अरुणाचल प्रदेश 2  
मेघालय 2 62%
पश्चिम बंगाल 2  
छत्तिसगड 1 56 %
मणिपूर 1 78.20%
मिझोराम 1  
नागालँड 1  
त्रिपूरा 1  
सिक्कीम 1  
अंदमान  

1

 

 

70.67%

65.9%

निकोबार
लक्षद्वीप
तेलंगणा 17 60.57%
   

(हेही वाचा, Lok Sabha Elections 2019 First Phase Poll Live Updates: पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात 7 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 55 टक्के मतदान)

दरम्यान, महाराष्ट्रातही मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. महाराष्ट्रात विदर्भातील एकूण 7 मतदारसंघात मतदान पार पडले. निवडणूक आयोग कार्यालयाने प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदारसंघनिहाय मतदान टक्केवारी (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) 55 टक्के मतदान पार पडले, मतदारसंघ निहाय हे मतदान वर्धा 55.36 टक्के, नागपूर 53.13 टक्क, यवतमाळ-वाशिम 53.97 टक्के, भंडारा-गोंदिया 60.50 टक्के, चंद्रपूर 55.97 टक्के, रामटेक 51.72 टक्के, गडचिरोली 61.33 टक्के असे आहे.