मतदारसंघनिहाय मतदान टक्केवारी (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
वर्धा 55.36 टक्के
नागपूर 53.13 टक्के
यवतमाळ-वाशिम 53.97 टक्के
भंडारा-गोंदिया 60.50 टक्के
चंद्रपूर 55.97 टक्के
रामटेक 51.72 टक्के
गडचिरोली 61.33 टक्के
Lok Sabha Elections 2019 First Phase Poll Live Updates: पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात 7 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 55 टक्के मतदान
लोकसभा निवडणूक 2019 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला देशभरात आजपासून सुरुवात होईल. सकाळी सात ते संध्याकाळी सहा या कालावधीत मतदान पार पडणार आहे.
देशात सात तर राज्यात चार टप्प्यात मतदानाची प्रक्रीया पार पडणार असून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या सात मतदारसंघांचा समावेश आहे. तर देशात आंध्रपद्रेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, मिझोरम, नागालँड, ओडिशा, सिक्कीम, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड,पश्चिम बंगाल, निकोबार या राज्यात मतदान होणार आहे. या सर्व राज्यात मिळून एकूण 91 मतदारसंघ आहेत. (महाराष्ट्र लोकसभा निवडणूक मतदान पहिला टप्पा तारीख, मतदारसंघ आणि उमेदवार यादी)
विदर्भातील 10 पैकी 7 मतदारसंघात आज मतदान होणार असून यात 116 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर मतदारांची संख्या 1 कोटी 30 लाख इतकी आहे. मतदानासाठी 15 हजारांपेक्षा जास्त मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
ईव्हिएम मशिन्सच्या हॅकिंगमुळे यंदा लोकसभेच्या निवडणुत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार आहे. इतकंच नाही तर मतदान केल्यानंतर संबंधित उमेदवाराचा मतं गेलं का याची खात्री होण्यासाठी या मशीनमधून चिठ्ठी दिसण्याची सोय करण्यात आली आहे. (महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप उमेदवार संपूर्ण यादी)
या निवडणुकीत गर्भवती, दिव्यांग यांना रांगेशिवाय मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर अपंग मतदारांना विशेष सोयी-सुविधा देण्यात आल्या आहे.
महाराष्ट्रात 11, 18, 23 आणि 29 एप्रिल या चार दिवशी मतदान पार पडणार असून 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे.
Water Levels in Mumbai Lakes: मुंबईच्या सात जलाशयांत 97.76% पाणीसाठा; मागीलवर्षीपेक्षा किंचित कमी
Pune Ganesh Visarjan Road Diversions: धायरी फाटा, केशवनगर-मुंढवा आणि हडपसर परिसरातील मार्गांमध्ये बदल; पर्यायी रस्त्यांची यादी जाहीर
Banks Open on Sunday 27th September: ग्राहकांच्या सोयीसाठी रविवारी 27 सप्टेंबर रोजी बँका सुरू राहणार
Krishna Mukerji Passes Away: राणी मुखर्जीच्या आई कृष्णा मुखर्जी यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन