कुमारस्वामी यांनी 100 वेळा अंघोळ केली तरीही ते काळ्या म्हशीसारखे दिसतात: भाजप आमदार राजू कागे
राजू कागे आणि कुमारस्वामी (फोटो सौजन्य-ट्वीटर)

भाजप (BJP) आमदार  राजू कागे (Raju Kage)  यांनी कर्नाटक मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यांच्यावरुन वादग्रस्त विधान केले आहे. या विधानामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, कुमारस्वामी यांनी 100 वेळा जरी अंघोळ केल्यास ते काळ्या म्हशीसारखेच दिसतात.

तर काही दिवसांपूर्वी कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे राजू कागे यांनी कुमारस्वामी यांना प्रतिउत्तर देत असे म्हटले आहे. तसेच राजू कागे यांनी असे म्हटले आहे की नरेंद्र मोदी गोरे असून कुमारस्वामी काळ्या रंगाचे आहेत. यावरुन वादग्रस्त विधानाच्या माध्यमातून कागे यांनी वर्णभेद केला आहे. कागे यांच्या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच अशा पद्धतीचे विधान केल्यास कागे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: दुसऱ्या टप्प्यातील मतदान 95 जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; 18 एप्रिल रोजी मतदान)

तर मोदी हे सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी मेकअप करतात असे म्हटले होते. त्यानंतरच ते कॅमेरासमोर येतात. तसेच मोदी यांचा चेहरा पत्रकार पाहतात मात्र आमच्या चेहऱ्याकडे पत्रकार ढुंकूनसुद्धा पाहत नाही असे विधान कुमारस्वामी यांनी केले होते.