नरेंंद्र मोदी (फोटो सौजन्य-PTI)

Lok Sabha Elections 2019: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप (BJP) पक्ष आज (8 एप्रिल) जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. तसेच संकल्पपत्र नावाने हा जाहीरनामा प्रसिद्ध करणार असल्याची माहिती भाजपने ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. या जाहीरनाम्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा आणि भाजप पक्षातील अनेक दिग्गज नेतेसुद्धा उपस्थित राहणार आहेत.

गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनाम्यासाठी समिती तयार करण्यात आली होती. यासाठी देशभरातून 300 रथ, 7500 सूचना पेट्यांसह इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. यावरुनच भाजपने जाहीरनामा बनवला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या जाहीरनाम्यात शेतकरी आणि तरुण वर्गासाठी तरतूद देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचसोबत रोजगार निर्मितीबद्दल ही ठोस निर्णय घेण्यात येणार आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: ‘फिर एक बार मोदी सरकार’, जुन्यात थोडा नवा बदल करत भाजपकडून टॅगलाईनची घोषणा; प्रचार गीत लॉन्च)

मोदी सरकारने 2014 रोजी निवडणुकीसाठी 'अब की बार, मोदी सरकार' अशी टॅगलाईन पक्षासाठी ठेवली होती. तर आता मोदी सरकारने या टॅगलाईनमध्ये थोडा बदल करुन 'फिर एक बार, मोदी सरकार' अशी ठेवण्यात आली आहे. तसेच काँग्रेस काहीही करु शकली नाही. काँग्रेसला गेल्या 72 वर्षात जे जमले नाही ते आम्ही (भाजप) अवघ्या पाच वर्षांत करुन दाखवले असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे.