NDA: राष्ट्रीय लोकशाही आघाडी संसदीय समितीची आज दिल्लीत बैठक; राज्यातील शिवसेना, भाजप खासदार दिल्लीला रवाना; नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड होण्यीच शक्यता
PM MODI (Photo Credits: ANI / Twitter)

Lok Sabha election results 2019: लोकसभा निवडणुकीत भाजप नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थातच NDA ने विक्रमी विजय मिळवला. या विजयानंतर नवे सरकार स्थापन करण्यासाठी वेगवान हालचाली सुरु आहेत. या पार्श्वभूमिवर एनडीए (NDA)च्या संसदीय समितीची बैठक आज (25 मे 2019) राजधानी दिल्ली येथे सायंकाळी 5 वाजता पार पडत आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांची नेतेपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला भाजप, शिवसेना नवनियुक्त खासदारांचीही बैठकही दिल्लीत पार पडत आहे. या बैठकीसाठी भाजप, शिवसेनेचे नवनियुक्त खासदारही दिल्लीला पोहोचले आहेत.

दरम्यान, या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर हेसुद्धा एनडीएच्या बैठकीसाठी मुंबईहून दिल्लीला निघाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दावे आणि भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे हे देखील दिल्लीला पोहोचले आहेत. (हेही वाचा, दिल्ली: राहुल गांधी देणार अध्यक्ष पदाचा राजीनामा? काँग्रेस कार्यकारी समिती बैठकीत प्रस्ताव ठेवण्याची शक्यता)

एनडीएच्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि भाजपचे महत्त्वाचे नेते यांच्यासह एनडीएतील घटक पक्षाचे प्रमुख नेतेही या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नेमकी काय चर्चा होते याबाबत मोठी उत्सुकता आहे. तसेच, एनडीएतील घटक पक्षांना सत्तेत किती वाटा मिळणार याबाबतही उत्सुकता आहे.