सीबीआयच्या (CBI) पथकाने गुरुवारी रात्री पी चिदंबरम ( P Chidambaram) यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. तर आयएनएक्स मीडिया (INX Media) प्रकरणी त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तर आज पी चिदंबरम यांना सीबीआयच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आले. मात्र आज विशेष कोर्टात या प्रकरणी निर्यण देण्यात आला असून त्यांना 26 ऑगस्ट पर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच पी चिदंबरम यांच्या परिवारातील मंडळींना नियमित त्यांना अर्धा तास त्यांना भेटण्यासाठी वेळ देऊ करण्यात आली आहे. CBI च्या सुत्रांकडून असे सांगण्यात आले की, 28 मे 2018 रोजी चिदंबरम यांना नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीससोबत त्यांना याबाबत सहकार्य करावे असे सुद्धा सांगण्यात आले होते.(पी चिदंबरम यांना अटक झाली ते INX मीडिया प्रकरण नक्की आहे तरी काय? जाणून घ्या घटनाक्रम)
ANI ट्वीट:
INX Media Case: Former Union Finance Minister #PChidambaram being taken from Court after the Court sent him to CBI custody till August 26. pic.twitter.com/0XNUsBalMA
— ANI (@ANI) August 22, 2019
मात्र बुधवारी चिदंबरम यांना अटक करण्यापूर्वी त्यांनी काँग्रेस कार्यालयात एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले. या पत्रकार परिषदेत त्यांनी माझ्या विरोधात खोटा आरोप लगावला जात असल्याचे म्हटले. तसेच INX मीडियाच्या प्रकरणात माझ्या विरोधात प्रचार केला जात असल्याचे ही चिदंबरम यांनी म्हटले होते. मला आणि माझ्या मुलाला फसवले गेले असल्याचे ही त्यांना सांगितले. या प्रकरणी कोणतीही तक्रार किंवा घरातील सदस्यांच्या विरोधात कोणताही आरोप नसल्याचे ही चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.