 
                                                                 चेन्नई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) ही सद्य घडीची प्रभावी जोडगोळी आपल्या धाडसी निर्णयांमुळे राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय असते. काश्मीर (J&K) मधून कलम 370 हटवल्यानंतर तर त्यांचं प्रत्येक स्तरावरून कौतुक होत होते. अशातच आता सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) यांनी देखील पुढे येऊन मोदी- शहा यांना कौतुकाची थाप दिल्याचे समजत आहे, आज, म्हणजेच 11 ऑगस्ट ला रजनीकांत हे चेन्नई मध्ये उपराष्ट्रपती वेंकैया नायडू (Venkaiah Naidu) यांच्या स्वलिखित पुस्तकाच्या प्रकाशनासाठी उपस्थित होते, यावेळी त्यांनी मोदी- शहा यांची तुलना महाभारतातील कृष्ण- अर्जुनाच्या जोडीशी करून त्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. (धर्म परिवर्तन थांबवण्यासाठी नवा कायदा लागू करण्याच्या तयारीत मोदी सरकार, संसदेच्या पुढील सत्रात विधेयक मांडण्याची शक्यता)
प्राप्त माहितीनुसार, या कार्यक्रमामध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उपराष्ट्रपतींच्या "Listening, Learning and Leading” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी रजनीकांत यांनी अमित शहा यांना संबोधून काश्मीर निर्णय प्रकरणी केंद्र सरकारचे अभिनदंन केले, तसेच शहा यांनी संसदेत ज्या प्रकारे भाषण दिले त्याचेही कौतुक करत, मोदी आणि शहा हे जणू महाभारतातील कृष्ण आणि अर्जुनाची जोडी असल्याचे देखील रजनीकांत यांनी म्हंटले. यासोबतच त्यांनी उप राष्ट्रपतींचे सुद्धा कौतुक करत नायडू हे चुकून राजकारणात आले खरतर ते मुळात फार अध्यात्मिक आहेत अशी बतावणी केली.(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-कश्मीर वासियांना शुभेच्छा देत व्यक्त केल्या देशाबद्दल भावना)
दरम्यान रजनीकांत यांनी 31 डिसेंबर 2017 रोजी ‘रजनी मक्कल मन्दरम’ पक्षाची स्थपणा करून राजकारणात पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक प्रचार सभा घेतल्या, भाषणे दिली, लोकांचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. अनेक आंदोलनांमध्ये सक्रीय सहभागी होण्यापासून जाहीर पाठींबाही दर्शवला. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली होती.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
