भारताच्या दौऱ्यावर आलेल्या जर्मन चान्सलर अँजेला मर्केल (Angela Merkel) यांचे शुक्रवारी राष्ट्रपती भवनात पारंपरिक रुपात स्वागत करण्यात आले. त्या दरम्यान राष्ट्रगीत सुरु असताना ही मार्केल यांनी उपस्थिती लावली. मात्र त्यावेळी मर्केल राष्ट्रगीता वेळी उभ्या राहण्याऐवजी बसूनच राहिल्या होत्या. कारण मर्केल यांची तब्येत ठिक नसल्याने त्या बसून असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना एका मर्यादित वेळानंतर उभे राहिल्यानंतर त्रास होतो. त्यामुळेच जर्मनीकडून भारताच्या सरकारला राष्ट्रगीता वेळी बसण्याची परवानगी द्यावी असे सांगण्यात आले होते. त्यानंतर सरकारकडून हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
राष्ट्रपती भवनात पोहचल्यानंतर मर्केल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले. त्यावेली मर्केल यांनी अधिकारी आणि विदेश मंत्री एस जयशंकर यांची सुद्धा भेट घेतली. भारतात येऊन मी खुप खुश असून भारत-जर्मनीच्या मधील नातेसंबंध उत्तम आहेत. वैविध्यपूर्ण अशा भारत देशाची जर्मनीला आदर आहे. मर्केल यांनी राजघटात जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली सुद्धा वाहिली.(अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केलं 125 रुपये किंमतीच्या नाण्याचे लोकार्पण)
#WATCH German Chancellor Angela Merkel pays tribute to Mahatma Gandhi at Rajghat in Delhi pic.twitter.com/MdYxz8bY7D
— ANI (@ANI) November 1, 2019
मर्केल गुरुवारी उशिराने भारतात पोहचल्या. त्यावेळी राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मर्केल आणि मोदी यांनी एकमेकांची भेट हैदराबाद हाउस मध्ये झाली. या दोन्ही देशाच्या नेत्यांच्या दरम्यान काही महत्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा झाली.