नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी: कमल हासन
Actor-Politician Kamal Haasan. (Photo: File)

Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक 2019 साठी शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यातील प्रचार जोरदार सुरु आहे. विविध राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या या रणधुमाळीत अभिनेता कमल हासन (Kamal Haasan) यांनी नथुराम गोडसे (Nathuram Godse) याच्याविरोधात मोठे वक्तव्य केले आहे. नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता असे कमल हासन यांनी म्हटले आहे. कमल हासन यांच्या या विधानावरुन जोरदार वाद उत्पन्न होण्याची शक्यता आहे. कमल हासन यांनी म्हटले आहे की, नथुराम गोडसे हा भारतातील पहिला हिंदु दहशतवादी (India’s First Terrorist) होता. हे विधान मी मुस्लिमबहुल भागात आहे म्हणून करत नाही तर, गांधींच्या पुतळ्याशेजारी आहे. त्यामुळे करत असल्याचेही कमल हासन म्हणाले. कमल हासन यांनी हे विधान तामिळ भाषेत केले आहे. वृत्तसंस्थांनी विविध भाषांमधून हे वृत्त देताना त्यांनी हिंदू दहशतवादी हा शब्दप्रयोग केला आहे. साधारण एक वर्षापूर्वी हासन यांनी मक्कल नीधि मय्यम (Makkal Needhi Maiyam)या पक्षाची स्थापना केली आहे.

तामिळनाडू येथील अरावाकुरुची विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना कमल हसन बोलत होते. या वेळी त्यांनी हे विधान केले. या वेळी बोलताना ते म्हणाले हे मी केवळ मुस्लिमबहुल परिसरात आहे म्हणून बोलत नाही. तर, मी गांधींच्या पुतळ्यासमोर असल्याने बोलत आहे. स्वतंत्र भारतात पहिला हिंदू दहशतवादी आहे. ज्याचे नाव नथुराम गोडसे असे आहे. कमल हासन यांनी गेल्या काही काळात राजकीय पाऊल ठेवले आहे. त्या आधी त्यांनी मक्कल नीधि मय्यम पार्टीची स्थापना केली. साधारण एक वर्षापूर्वी हासन यांनी मक्कल नीधि मय्यमची स्थापना केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कमल हासन यांनी जाहीर केले होते की, आपला पक्ष लोकसभा निवडणूक लढणार नाही. मात्र, आपला पक्ष विधानसभा निवडणुकीत लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. हासन यांनी मक्कल नीधि मय्यम पार्टीचा जाहीरनामा आणि उमेदवारांची दुसरी यादीही जाहीर केली आहे. आपल्या पक्षाचे उमेदवार म्हणजे आपला (कमल हासन) चेहरा असल्याचेच कमल हासन यांनी जाहीर केले आहे. मला रथ ओढणाऱ्यांपेक्षा रथ निर्माण करणाऱ्यांमध्ये अधीक ऋची असल्याचे हासन यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, कमल हासन यांचे वादग्रस्त वक्त्यव्य; पाकव्याप्त काश्मीर म्हणजे 'स्वतंत्र काश्मीर', जनमत घेण्याची मागणी)

वय वर्षे 64 पूर्ण असलेल्या कमल हासन यांनी आपल्या पक्ष आणि उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, या यादीसोबत हासन यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.