Goa Government (Photo Credits: Twitter/ ANI)

कर्नाटक पाठोपाठ गोवा राज्यातही मागील काही दिवसांपासून राजकीय बदल पहायला मिळाले आहेत. गोव्यातील 15 पैकी 10 कॉंग्रेस आमदारांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आता त्यापैकी 3 जणांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गोव्याच्या राजभवन परिसरात पार पडलेल्या शपथ सोहळ्यामध्ये चंद्रकांत कवळेकर (Chandrakant Kavlekar),फिलिप नेरी रॉड्रिग्ज (Filipe Nery Rodrigues), मोन्सेराते (Jennifer Monserratte) यांचा समावेश असून माजी गोवा विधानसभा उपाध्यक्ष मायकल लोबो Michael Lobo) यांनी देखील शपथ घेतली आहे. मोठी बातमी: कर्नाटक पाठोपाठ गोवा राज्यात राजकीय भूकंप; कॉंग्रेस पक्षाचे तब्बल 10 आमदार भाजपच्या गळाला

ANI Tweet

काल रात्री (13 जुलै) गोव्यामध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे चार आमदारांनी राजीनामा सुपूर्त केला. त्यांच्या ऐवजी नव्या चार नव्या चेहर्‍यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई, जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर आणि अपक्ष रोहन खंवटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

गोव्यातील राजकीय समीकरण बदलत आहे. काँग्रेसचे दहा आमदार भाजपमध्ये दाखल झाल्याने आता विधानसभेतील भाजपचे संख्याबळ 27 झाले. परिणामी गोवा फॉरवर्डचे 3आणि अपक्ष आमदार रोहन खंवटे या 4 मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे.