मोठी बातमी: कर्नाटक पाठोपाठ गोवा राज्यात राजकीय भूकंप; कॉंग्रेस पक्षाचे तब्बल 10 आमदार भाजपच्या गळाला
10 आमदार कॉंग्रेसमध्ये सामील (Photo Credits: ANII)

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा भाजप (BJP) पक्ष पुन्हा एकदा सत्तेत आल्यावर, एखाद्या लोहचुंबकप्रमाणे लोकांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. आता कर्नाटक नंतर गोवा (Goa) राज्यात फार मोठा राजकीय भूकंप उद्भवला आहे. अहवालानुसार गोव्यात काँग्रेस पक्षाच्या  (Congress) 15 पैकी 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गोव्यात सध्या भाजपचे सरकार आहे. या घटनेनंतर आता 2017 मध्ये विधानसभा निवडणुकीत एक मोठा पक्ष म्हणून उभारी घेतलेल्या काँग्रेसकडे अवघे 5 आमदार राहिले आहेत.

गोवा कॉंग्रेसचे दोन तृतीयांश आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गोव्याचे विरोधी पक्ष नेते कवळेकरही भाजपमध्ये सामील झाले. हे सर्व 10 आमदार आता नवी दिल्लीला रवाना झाले आहेत. भाजपमध्ये सामील झालेल्या आमदारांमध्ये बाबू कवळेकर, बाबुश मोनसेरेट, त्यांची पत्नी जेनिफर मोनसेरेट, टोनी फर्नांडिस, फ्रांसिस सिल्वेरा, फिलीप नेरी रोड्रिग्स, क्लेफासियो, विलफ्रेड सा, नीलकांत हलंकर आणि इसिडोर फर्नांडीस यांचा समावेश आहे. (हेही वाचा: कर्नाटक राजकीय पेच: मुंबई शहरातील पवई परिसरात संचारबंदी; सुरक्षेच्या कारणस्तव पोलिसांचा निर्णय)

गोवा मध्ये 40 सदस्यीय विधानसभेमधील काँग्रेसचे 15 पैकी 10 आमदार बुधवारी राजेश पाटनेकर यांनी भेटले, त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. गोवा विधानसभेमध्ये भाजपचे 17, कॉंग्रेसचे 15, जीपीएफ चे 3, एमजीपी चा एक, राकांपा चे दोन आणि 2 अपक्ष आमदार आहेत. आता यातील कॉंग्रेसचे 10 आमदार भाजपमध्ये सामील झाले आहेत.