कर्नाटक राजकीय पेच: मुंबई शहरातील पवई परिसरात संचारबंदी; सुरक्षेच्या कारणस्तव पोलिसांचा निर्णय
File Image ( Photo Credits: Twitter)

कर्नाटक विधानसभा सदस्याच्या राजीनामा दिलेले कॉंग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदार डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) सध्या मुंबईमध्ये आहेत. पवईच्या रेनेसा हॉटेलमध्ये (Renaissance Mumbai Convention Centre Hotel) शिवकुमार यांना रोखण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर तणावग्रस्त झालेल्या वातावरणामध्ये आता 9-12 जुलै पर्यंत Section 144 म्हणजेच

संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यानुसार चारपेक्षा जास्त जण एका जागी जमू शकत नाहीत.

पवईच्या हॉटेलबाहेर एसआरपीएफ आणि रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. काँग्रेस पक्षाच्या 21 मंत्र्यांचा राजीनामा; मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी म्हणतात 'प्रकरण निवळले, सरकारला कोणताच धोका नाही'

ANI Tweet 

डी.के शिवकुमार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे, अशा आशयाचं पत्र कर्नाटकच्या 10 बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांना पाठवलं आहे.

कर्नाटक सरकारवरचं संकट अजून कायमच आहे. दोन अपक्ष आमदारांनी काँग्रेस आणि जेडीएस यांच्या आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेत राजीनामे दिले. एच. नागेश आणि आर. शंकर हे राजीनाम्यानंतर राज्यपालांना भेटले आणि त्यांनी आपला पाठिंबा भाजपला असल्याचं त्यांना सांगितलं आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये सध्या अस्थिरतेचं चित्र आहे