Lok Sabha Elections 2019: माजी एटीएस चीफ हेमंत करकरे यांच्यावरील वादग्रस्त विधानावरून साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस
Pragya Singh Thakur (Photo Credits: File Photo)

26/11 दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले तत्कालीन एटीएस चीफ हेमंत करकरे (Hemant Karkare) यांच्याविरोधात केलेल्या विधानामुळे साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर (Pragya Singh Thakur) यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना भाजप पक्षाने भोपाळ (Bhopal) लोकसभा मतदारसंघातून उमेद्वारी दिली आहे. प्रचारादरम्यान बोलताना साध्वी प्रज्ञा सिंग यांनी ‘मी ज्या दिवशी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी हेमंत करकरेंना दहशतवाद्यांनी मारले, त्यादिवशी सुतक संपले’, अशा आशयाची विधाने केल्याने चर्चेला उधाण आलं होतं. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या वादग्रस्त विधानावर BJP ची प्रतिक्रिया: हेमंत करकरे ‘शहीद’, साध्वींचं वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत

निवडणूक आयोगाची नोटीस 

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  भोपाळचे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी सुदाम खाडे यांनी ही माहिती दिली आहे. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला बजावण्यात आलेल्या करणे दाखवा नोटीशीला 24 तासांमध्ये उत्तर द्यायचे आहे. त्यानंतर स्थानिक निवडणूक आयोग संबंधित अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला देणार आहे. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, IPS Association ने केला निषेध

ANI Tweet

काल (19 एप्रिल) दिवसभर साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरच्या वादग्रस्त विधानावरून वातवरण तापलेले पाहून रात्री उशिरा साध्वी प्रज्ञाने आपलं विधान मागे घेतले होते.