साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर (Photo Credits: IANS)

मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी आणि भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपाची उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर (Pragya Singh Thakur) यांनी शहीद हेमंत करकरे (Hemant Karkare)  यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानं तर आज देशभरात त्याचे प्रतिसाद उमटले आहेत. सामान्य नागरिकांपासून सनदी अधिकार्‍यां नी साध्वी प्रज्ञा सिंग  यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध केला आहे. वाढता रोष पाहता भारतीय जनता पक्षाकडून याबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, IPS Association ने केला निषेध

काय आहे साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया

भारतीय  जनता पक्षाने एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून साध्वी प्रज्ञा सिंग यांचं वक्तव्य हे वैयक्तिक मत असून भारतीय जनता पक्ष शहीद हेमंत करकरे यांच्या शौर्याचा सन्मान करते. साध्वी प्रज्ञा सिंग या अनेक वर्ष तुरुंगात होत्या. त्यामुळे मानसिकआणि शारिरीक परिणाम झाल्याने त्यांनी हे वक्तव्य केले असावे असे सांगण्यात आले आहे. मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांशी लढताना हेमंत करकरे यांना हौताम्य आले होते.

साध्वी प्रज्ञा सिंग

हेमंत करकरे हे एटीएस चिफ होते. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांशी सामना करताना तीन सनदी अधिकारी मृत्यूमुखी पडले त्यापैकी एक म्हणजे हेमंत करकरे.