मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (CM Eknath Shinde) बंडानंतर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पहिल्यादाचं शिवसेनेचं (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या सामना (Saamana) वृत्तपत्राला मुलाखत दिली. ही मुलाखत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतली. गेले दोन दिवसांपासून उध्दव ठाकरे या मुलाखतीचे टीझर (Teaser Share) शेअर करत होते. टीझर बघता संपूर्ण राज्यातील जनतेला या विशेष मुलाखतीची (Interview) प्रतिक्षा होती. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसारित झाला आहे. यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
या मुलखतीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Deputy CM Devendra Fadnavis) पत्रकारांनी प्रतिक्रीया विचारली तेव्हा ते म्हणले मी फिक्स मॅच (Fix Match) बघत नाही मला लाईव्ह मॅच (Live Match) बघायला आवडत, असा खोचक टोला फडणवीसांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारकडे (Maha Vikas Aghadi Government) बहूमत नसताना उध्दव ठाकरेंच्या मुख्यमंत्री म्हणून राजीनाम्याच्या काही तास आधी ठाकरे सरकारकडून 400 जीआर(GR) काढण्यात आले होते आणि असलेल्या रकमेच्या पाच पट पैसे वाटण्यात आले म्हणुन याचा रिव्हयू आम्ही करत आहोत, असं केलं नाही तर सरकारचा भट्टा बसेन अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. (हे ही वाचा:- Shiv Sena Poll Symbol Row: धनुष्यबाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयात 1 ऑगस्ट रोजी सुनावणी)
उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद https://t.co/toaTcAS8Dr
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) July 26, 2022
उध्दव ठाकरेंच्या मुलाखतीचा उद्या दुसरा (Interview Part 2) भाग प्रसारीत होणार आहे. आज प्रसारित झालेल्या मुलाखतीत उध्दव ठाकरे आक्रमक तसेच भावनिक मोडमध्ये बघायला मिळाले तरी उद्याच्या भागात उध्दव ठाकरे कसे व्यक्त होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तरी या मुलाखतीवर विविध राजकीय प्रतिक्रीया येताना दिसत आहे.