दिल्लीत भाजप खासदार गौतम गंभीर यांचे बेपत्ता झाल्याचे जागोजागी पोस्टर
गौतम गंभीर पोस्टर (Photo Credits-ANI)

राजधानी दिल्लीत भारतीय संघातील माजी क्रिकेटर आणि पूर्व दिल्ली येथून भाजप पक्षातून निवडणूक लढवलेले खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) बेपत्ता झाल्याचे जागोजागी पोस्टर लावण्यात आले आहेत. हे पोस्टर आयटीओ च्या परिसरातील झाडे आणि भिंतीवर लावले असून त्यावर तुम्ही गौतम गंभीर यांना कुठे पाहिले आहे का? असा सवाल सुद्धा केला आहे. गौतम गंभीर यांना दोन दिवसांपूर्वीच जिलेबी खाताना पाहिले होते. त्यानंतर गौतम गंभीर कुठे बेपत्ता झाले आहेत याचा शोध आता संपूर्ण दिल्लीत घेतला जात आहे.

दिल्लीत प्रदुषणाबाबत एक बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीला गौतम गंभीर यांनी उपस्थिती लावणे गरजेचे होते. परंतु ते इंदौर येथे सुरु असलेल्या क्रिकेटच्या सामन्यासाठी कॉमेन्ट्री करण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान गौतम गंभीर यांना माजी क्रिकेटर लक्ष्मण यांच्यासोबत जिलेबी खातानाचा फोटो समोर आला होता. या प्रकारावर आम आदमी पक्षाने गौतम गंभीर यांच्यावर टीका केला. तसेच आरोप करत असे ही म्हटले की, ज्यावेळी प्रदुषाचा मुद्दा उपस्थित केला जातो त्यावेळी ते पहिले पुढे असतात. मात्र जेव्हा प्रदुषण नियंत्रणाबाबतचा मुद्दा अल्यास त्यांनी अनुपस्थिती लावली.(राजधानी दिल्लीत प्रदूषणाच्या पातळीत वाढ)

गौतम गंभीर यांचा जिलेबी खातानाचा फोटो समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीका केली. तसेच प्रदुषणाबाबत पार पडलेल्या बैठकीला अनुपस्थिती दाखवल्याने त्यांना या मुद्द्याबाबत किती गांभीर्य आहे हे दिसून येत असल्याचे ही आप पक्षाचे म्हटले आहे.