राजधानी दिल्लीत प्रदूषणाच्या पातळीत वाढ; Delhi-NCR मधील शाळांना 14 व 15 नोव्हेंबर रोजी सुट्टी
File image of air pollution in Delhi | (Photo Credits: PTI)

राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) प्रदूषणाच्या पातळीत (Pollution Level) पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढ आहे. ही गंभीर परिस्थिती घ्यानात घेऊन दिल्ली आणि एनसीआरमधील (NCR) शाळांना उद्या आणि परवा म्हणजेच 14 व 15 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याधीही सरकारने शाळा आणि कॉलेजेस 5 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली सरकारचा हा निर्णय सार्वजनिक आयोग्यावर ओढवलेल्या आणीबाणीच्या अवस्थेमुळे घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण प्रदूषण (प्रतिबंध आणि नियंत्रण) प्राधिकरणाने दिल्ली-एनसीआरमधील हॉट-मिक्स प्लांट्स आणि स्टोन-क्रशरवरील बंदी 15 नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे.

यापूर्वी 4 नोव्हेंबर रोजी, सुप्रीम कोर्टाने पुढील आदेश येईपर्यंत दिल्ली परिसरातील बांधकामांच्या कामांवर बंदी घातली होती. दिल्लीच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे. यामुळे मुलांना याचा त्रास होऊ नये म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (सीपीसीबी) सदस्य सचिव प्रशांत गर्गवा म्हणाले की, यावर्षी दिल्लीच्या विषारी हवेमध्ये पेंढा मोठी भूमिका बजावत असून, त्याचे योगदान 44 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची हवा गुणवत्तेची देखरेख करणारी यंत्रणा सफर यांच्या म्हणण्यानुसार, पंजाब आणि हरियाणामध्ये पेंढा जाळल्याने निर्माण झालेल्या धुराचे प्रमाण यंदा सर्वाधिक आहे.

(हेही वाचा: दिल्लीतील प्रदूषणाला 'चीन' आणि 'पाकिस्तान' जबाबदार; भाजप नेते विनीत अग्रवाल यांचा जावई शोध)

वाढती प्रदूषणाची पातळी पाहता, दिल्ली-एनसीआर प्रदेशात सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन घोषणा करून नोव्हेंबर सुरूवातीला दिल्ली सरकारने चार दिवस सर्व शाळा बंद ठेवल्या होत्या. हवेची गुणवत्ता सुधारल्यानंतर 5 नोव्हेंबर रोजी शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या. गेल्या 15 दिवसांत तिसऱ्यांदा प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे शहरातील ‘आपत्कालीन’ प्रदूषण पातळी निर्माण झाली