
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून त्याच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रविवारी देशभरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आल्याने सर्व ठिकणी शांतता दिसून आली. त्यानंतर कलम 144 सुद्धा लागू करण्यात आला. मात्र सोमवारी सकाळी विविध ठिकाणी लॉकडाउनची स्थिती असताना सुद्धा घराबाहेर पडल्याचे चित्र दिसून आले आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे वारंवार आवाहन केले आहेच. पण आता लॉकडाउनची परिस्थिती सुद्धा गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले आहे. ऐवढेच नाही तर राज्यातील स्थानिक सरकारला त्यांनी नियम आणि सुचनांचे पालन करण्यास नागरिकांना भाग पाडावे असे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की. लॉकडाउनची परिस्थिती ही अद्याप नागरिक गंभीर्याने घेत नाही आहेत. कृपा करुन स्वत:ची कोरोना पासून काळजी घ्या. परिवाराचा कोरोना पासून बचाव करा आणि निर्देशनांचे पालन करा. तसेच विविध देशातील स्थानिक सरकारने सुद्धा नियम आणि कायद्यांचे पालन करावे असे ही मोदी यांनी म्हटले आहे.(राजधानी दिल्लीच्या सातही जिल्ह्यात जमावबंदी; मेट्रो, बससेवाही बंद, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मोठा निर्णय)
लॉकडाउन को अभी भी कई लोग गंभीरता से नहीं ले रहे हैं। कृपया करके अपने आप को बचाएं, अपने परिवार को बचाएं, निर्देशों का गंभीरता से पालन करें। राज्य सरकारों से मेरा अनुरोध है कि वो नियमों और कानूनों का पालन करवाएं।
— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2020
देशभरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 300 पेक्षा अधिक झाला आहे. तर गुजरात राज्यात कोरोना व्हायरसच्या पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडावर पोहचला असून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. येत्या 31 मार्च पर्यंत दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश यांच्यासह अन्य ठिकाणी सुद्धा लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत.