Coronavirus: डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ यांना घराबाहेर काढणाऱ्या घरमालकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देशन
Coronavirus Outbreak. Image Used For Representative Purpose Only. (Photo Credits: IANS)

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लॉकडाउन येत्या 14 एप्रिल पर्यत लागू करण्यात लागू करण्यात आले आहे. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथील नागरिकांना संबोधित केले. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी असे सांगितले आहे की, डॉक्टर्स, नर्स किंवा अन्य प्रोफेशनल्स यांना कोरोनाच्या भीतीपोटी घराबाहेर काढणाऱ्या घरमालकांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देशन देण्यात आले आहे. सरकारच्या अधिसुचनेनुसार, कोविड-19 च्या विरोधात लढणाऱ्या आणि त्यावर उपचार करणाऱ्यांना त्रास देण्यात येत आहे. मात्र ही गोष्ट अत्यंत खेदात्मक असून अत्यावश्यक सेवेत बाधा टाकण्यासारखे आहे.

दिल्लीत कोरोना व्हायरसच्या संबंधित काही नियम लागू करण्यात आले आहेत. तर कायद्याअंतर्गत घराहबाहेर काढणाऱ्या घरमालकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, पोलिसांना आदेश देण्यात आले आहे. तसेच अधिकाऱ्यांनी या संदर्भातील प्रत्येक दिवसाचा रिपोर्ट सुद्धा देण्यात यावा असे ही सांगण्यात आले आहे. यापूर्वी एम्स मधील डॉक्टरांनी मंगळवारी असे म्हटले होते की, त्यांच्या काही सहकर्मचाऱ्यांसोबत वाईट वर्तवणूक करण्यात आली. ऐवढेच नाही तर त्यांना घरी खाली करण्याचे सुद्धा सांगण्यात येत आहे. त्यामुळे या गोष्टीत सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.(आपल्याला 21 दिवसांत कोरोना व्हायरसच्याविरोधात लढाई जिंकायची आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे मांडले 'हे' महत्वाचे मुद्दे)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात असे लिहिण्यात आले होते की, काही डॉक्टरांना कोरोना व्हायरसमुळे त्यांना रस्त्यावर यावे लागले आहे. तसेच घरमालाकांकडून घर खाली करण्यात यावे असे सांगण्यात आल्याने यावर काहीतरी ठोस निर्णय द्यावा असे ही म्हटले होते. त्यानंतर अमित शहा यांनी दिल्लीतील पोलिसांच्या प्रामुख्यांसोबत या संदर्भात बातचीत केली आहे. तसेच अशा प्रकारच्या घटनांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देशन दिले आहेत.