
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर (Coronavirus) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी देशातील संपूर्ण जनतेला संबोधित केले. कोरोनाव्हायरसची प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांच्या संक्रमणाची सायकल तोडणे गरजेचे होते. सोशल डिस्टंस केवळ रुग्णांसाठी नाही तर, देशातील प्रत्येक नागरिकांसाठी महत्वाचे आहे. यातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडॉऊन घोषीत केले आहे. त्यानंतर आज नरेंद्र मोदी यांनी आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीतून जनतेशी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले की, महाभारताचे युद्ध 18 दिवसांत जिंकले गेले होते. आता आपल्याला 21 दिवसांत कोरोनाविरोधातील युद्ध जिंकायचे आहे. याशिवाय नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुढचे 21 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. हे 21 दिवस नाही सांभाळले तर, आपला देश आणि आपण 21 वर्ष मागे जाऊ. अनेक कुटुंब उध्वस्त होतील. ही गोष्ट मी पंतप्रधान म्हणून नाही तर आपल्या परिवाराचा सदस्य म्हणून बोलत आहे. त्यामुळे बाहेर पडू नका, घरातच राहा”, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दरम्यान आज नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे अतिशय महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus: ताप, खोकल्याच्या त्रासाला कोरोना व्हायरस समजून उत्तरप्रदेश येथे एका तरुणाची गळफास लावून आत्महत्या
अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचा सन्मान करा-
संपूर्ण देशात कोरोना व्हायरसन थैमान घातले असतानाही डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सरकारी कर्मचारी नागरिकांना अत्यावश्यक सेवा देण्याचे काम करत आहे. या सर्वांचा प्रत्येकांनी सन्मान करायला हवा आहे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी आज केली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संपूर्ण देशात जनता कर्फ्यूचे आयोजन केले होते. या कर्फ्यू दरम्यान मोदींनी आज संध्याकाळी 5 वाजता आपल्या घरातील गॅलरीमधून टाळ्या आणि थाळ्या वाजवून आपल्यासाठी काम करत असलेल्या डॉक्टर आणि पोलीस यासारख्या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यास सांगितले होते.
राज्य सरकार मला विश्वास आहे-
चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने आता भारतातही धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. यातच केंद्र सरकारसह राज्य सरकारही महत्वाची पाऊले उचलताना दिसत आहे. यापुढेही राज्य सरकार अत्यावश्यक वेळेत योग्य निर्णय घेतली आणि देशावर वावरत असलेल्या संकटावर मात करतील, असा विश्वासही नरेंद्र मोदी यांनी दर्शवला आहे.
देशावर कोरोनाचे संकट वावरत आहे-
सध्या कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. देशात कोरोना बाधीत रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. कोरोना व्हायरस हे देशावर वावरत असलेले मोठे संकट आहे. यात नागरिकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने केलेल्या आवाहनाचे पालन केले पाहिजे, असे नरेंद्र मोदी जनतेला म्हणाले. याशिवाय नागरिकांना सोशल डिस्टिंगचे महत्वही पटवून दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे भारतात आतापर्यंत 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, कोरोनाबाधीत लोकांची स्ख्या 562 पोहचली आहे. भारतात सर्वाधिक कोरोना बाधीत महाराष्ट्रात आढळले आहेत. सध्या महाराष्ट्रातील मुंबई येथे नुकतेच नवे 5 लोक आढळले असून राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्या 122 वर गेली आहे.