Election Commission of India. File Image. (Photo Credits: PTI)

बिहार विधानसभा निवडणूका (Bihar Assembly Elections) आणि विविध राज्यांमधील 65 विधानसभा आणि संसदीय जागांवर पोटनिवडणूका (By-Elections) एकाच वेळी होतील, असे निवडणूक आयोगाने (Election Commission of India) आज (शुक्रवार, 4 सप्टेंबर) सांगितले. विविध राज्यांतील पोटनिवडणुका प्रलंबित ठेवण्याबाबत निवडणूक आयोगाच्या आढावा बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान देशातील कोरोना व्हायरस संकटाची परिस्थिती आणि पूर परिस्थिती याबाबत राज्य मुख्य सचिवांकडून पोल पॅनलने माहिती घेतली आहे. (बिहार विधानसभा निवडणूक आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती)

बिहार विधानसभा निवडणूक देखील लांबणीवर पडली असून 29 नोव्हेंबर पूर्वी निवडणूक होणे गरजेचे आहे. त्यामुळे 65 पोटनिवडणूका आणि बिहार विधानसभा निवडणूक एकाच वेळी होतील, असे निवडणूक आयोगाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. या निवडणूका एकत्रित घेतल्यामुळे कायदा, सुव्यवस्था यांची अंमलबजावणी होणे काहीसे सोपे होईल,असेही निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, देशातील पूरपरिस्थिती आणि कोविड-19 संकट यामुळे अनेक पोटनिवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तसंच बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबर रोजी समाप्त होत असल्याने या दोन्ही निवडणूका एकत्रित घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. (Bihar Assembly Election 2020: देवेंद्र फडणवीस यांना बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपकडून मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता)

बिहार विधानसभा निवडणूक आणि 65 पोट निवडणूकांच्या तारखा योग्य वेळी जाहीर करण्यात येतील, असेही ECI कडून सांगण्यात आले आहे. पोटनिवडणूका होणाऱ्या 65 रिक्त जागांपैकी 64 विधानसभेच्या आणि एक संसदीय जागा आहे.