Bihar Assembly Election 2020: देवेंद्र फडणवीस यांना बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपकडून मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता
Devendra Fadnavis | (Photo Credits: Facebook)

विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना येत्या बिहार (Bihar) विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. पुढच्या काही महिन्यातच बिहार विधानसभा निवडणूक (Bihar Assembly Election) पार पडत आहे. या निवडणुकीत भाजपचे बिहार प्रभारी (Bihar Incharge) म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी सोपवली जाऊ शकते. पक्षातील सूत्रांच्या आधारे प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे वय, राजकीय क्षमता आणि निवडणूक हाताळण्याची रणनिती याबाबत पक्षाला अधिक विश्वास आहे. त्यासोबतच सध्या चर्चेत असलेले सुशांत सिंह राजपूत प्रकरण, महाराष्ट्र सरकार आणि बिहारी जनता या सर्व बाबींचा अभ्यास करुन पक्ष फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्याची शक्यता आहे. भाजपच्या एका राष्ट्रीय नेत्याने बिहार विधानसभा निवडणुकात फडणवीस यांना मोठी जबाबदारी मिळू शकते याबाबत आयएनएस या वृत्तसंस्थेशी बोलतान पुष्टी केली आहे. या नेत्याने असेही सांगितले की, याबाबत फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा लवकरच होईल. (हेही वाचा, भाजपची नवी रणनिती, देशभरात 50 वर्षांखालील कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष पदाची संधी)

भाजपतील सूत्रांनी म्हटले आहे की, सुशांत सिंह राजपूत यांचे नाव ज्या पद्धीतीने पुढे आले आहे त्यावर बिहारचे लोक नाराज आहेत. त्यामुळे या प्रकणाच्या जनतेशी भावनीक संबंध निर्माण झाला आहे. त्याचा पूर्णपणे फायदा उचलण्यासाठी भाजप देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी टाकू शकतो. उद्धव ठाकरे यांचे विरोधी पक्षातील प्रतिस्पर्धी म्हणून फडणवीस यांना ही जबाबदारी मिळू शकते.

दरम्यान, भाजपचे दुसऱ्या एका नेत्यान आयएनएसशी बोलताना सांगितले आहे की, राष्ट्रीय महासचिव आणि बिहारचे प्रभारी भूपेंद्र यादव महाराष्ट्र निवडणुकीत प्रभारी राहिले होते. त्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने दोन्ही नेत्यांनी भाजपला मोठे यश मिळवून दिले होते. पुढे जाऊन शिवसेना भाजप वेगळे झाले ही वेगळी गोष्ट आहे. पण पक्षाचा स्ट्राईक रेट अपेक्षपेक्षा अधिक मोठा होता. पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी ही जोडी महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकेल, असेही या नेत्याने म्हटले आहे.