भगवंत मान । ( Cr- Facebook )

पंजाबच्या निवडणूक निकालामध्ये (Punjab Assembly Election Result) आज आप (AAP) पक्षाने पहिल्याच प्रयत्नामध्ये मारलेल्या मुसंडीची चर्चा होत आहे. सोबतच आपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्याबद्दल उत्सुकता वाढली आहे. दरम्यान भगवंत मान हे राजकारणात येण्यापूर्वी विनोदी कलाकार होते. पहा त्यांचा एक विनोदी कलाकार ते आता पंजाबचे मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास कसा आहे?

भगवंत मान यांचा जन्म पंजाबमधील सतोज जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते विनोदी कलाकार म्हणून काम करत होते. हिंदी टेलिव्हिजन वर ‘ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ मध्ये सहभागी झाले होते. या शो च्या पहिल्या सीझन मध्ये भगवंत मान यांचा समावेश होता. विनोदी कलाकार असण्यासोबत ते व्यंगचित्रकार देखील होते. 2011 साली मनप्रित बादल यांच्या पीपल्स पार्टी ऑफ पंजाब पक्षातून त्यांचे राजकारणात पदार्पण झाले आहे. संगरुरमधील लेहरगा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांचा पराभव झाला होता. नंतर मान यांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश झाला.

आप च्या तिकीटावर त्यांनी 2014 लोकसभा निवडणूकीमध्ये संगरुर लोकसभा मतदारसंघात त्यांनी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते सुखदेव सिंग धिंडसा यांचा 2 लाखापेक्षा अधिकच्या मतांनी पराभव केला होता. 2017 साली त्यांच्यावर पंजाब प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.

भगवंत मान हे घटस्फोटित असून त्यांची मुलं परदेशामध्ये असतात. सध्या ते कौटुंबिक जीवनापासून दूर राहत पूर्ण वेळ राजकारणामध्ये सक्रिय आहेत.