Photo Credit- X

Arvind Kejriwal To Vacate Official Residence: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा (Arvind Kejriwal Resignation)दिला. त्यामुळे नियमानुसार, आता त्यांना सरकारी घर आणि सुविधांचा त्याग करावा लागणार (Arvind Kejriwal to vacate official residence)आहे. त्यावर, आप पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल आठवडाभरात घर रिकामे करणार असल्याचे सांगितले. काल सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर अतिशीAtishi) यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री बनवण्यात आले. (हेही वाचा: Atishi Marlena Delhi's New CM: आपच्या आतिशी मार्लेना दिल्लीच्या मुख्यमंत्री)

पत्रकार परिषदेत संजय सिंह म्हणाले, 'अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीतील जनता अत्यंत दु:खी आणि अस्वस्थ आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतरही अरविंद केजरीवाल यांनी जनतेच्या न्यायालयात लिटमस टेस्ट पास करण्यासाठी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. आता जनता त्यांच्या प्रामाणिकपणाला मान्यता देऊन त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करेल.' असा विश्वास संजय सिंह यांनी व्यक्त केला. (हेही वाचा: Arvind Kejriwal Resigns as CM: अरविंद केजरीवाल यांनी Delhi LG Vinai Kumar Saxena यांच्याकडे सोपावला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा)

मुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या सर्व सुविधांचा ते त्याग करतील आणि सर्वामान्य लोकांमध्ये सामान्य जीवन ते जगतील. त्यांची सुरक्षा धोक्यात असल्याचे आम्ही त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी ते मान्य नाही केले. मी गुन्हेगारांमध्ये सहा महिने तुरुंगात काढले. तेव्हा देवाने मला वाचवले होते, आताही मला वाचवेल. असे केजरीवाल म्हणाले असे संजय सिंह यांनी सांगितले.