Gautam Gambhir (Photo Credits-ANI)

भारताच्या संविधानात Article 35A आणि Article 370 मुळे स्वातंत्र्यानंतरही तब्बल 70 वर्ष काश्मीर प्रश्न ज्वलंत होता. मात्र आज घेण्यात आलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर आता जम्मू कश्मिरमधील आर्टिकल 370 हटवण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे भाजप सरकारवर अनेक ठिकाणहून एकाच वेळी कौतुक व टीकेचा वर्षाव होत आहे. याबाबत आता भारताचा पूर्व क्रिकेटर व भाजप पक्षाचा दिल्लीचा खासदार गौतम गंभीर याने देखील एक खास प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय घेऊन भाजपाने आजवर कोणालाही जे जमले नाही ते करून दाखवले आहे ज्यामुळे आता काश्मीर खोऱ्यात सुद्धा आपला अभिमानाने फडकावला जाईल असे म्हणत गंभीरने केंद्र सरकारची पाठ थोपटली आहे. जम्मू कश्मीर मध्ये Article 370 रद्द झाल्यानंतर भौगोलिक रचना,राष्ट्रध्वज यांच्यासोबत बदलणार या '10' गोष्टी

लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपा तर्फे देण्यात आलेल्या आश्वासनात काश्मीर प्रश्न मार्गी लावणे हा महत्वाचा मुदा होता. आपल्या आश्वासनावर टिकून राहत भाजपाने आपले काम केल्याचेही गंभीर याने म्हंटले आहे. Jammu and Kashmir: काय होतं जम्मू-कश्मीरमधलं कलम 370, जाणून घ्या सविस्तर

पहा गौतम गंभीर ट्विट

दरम्यान, कलम 35 A व कलम 370 हटवल्याने यापुढे काश्मीरमध्ये महत्वपूर्ण बदल होणार आहेत.ज्यानुसार काश्मीरच्या नागरिकांना यापुढे एक सामान नागरिकत्व मिळणार आहे. तसेच यापुढे जम्मू आणि काश्मीरचे वेगळे संविधान नसेल. तसेच जम्मू काश्मीरचा आणि भारताचा असा वेगवेगळा झेंडा नसेल. आता जम्मू, कश्मीरसह देशभरात तिरंगा फडकेल.