कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवली उच्चस्तरीय बैठक
PM Narendra Modi chairs a high-level meeting (PC - ANI)

देशात कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट सुरू आहे. हा विषाणून पूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा धोकादायक असल्याचंही म्हटलं जात आहे. गेल्या 24 तासात 93,249 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. तर 513 जणांचा मृत्यू झाला असून 60,048 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील अनेक दिग्गज तसेच कलाकारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. देशातील कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. या बैठकीत कोविड-19 आणि लसीकरण मोहिमेशी संबंधित मुद्द्यांचा आढावा घेतला जाईल. या बैठकीला कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि डॉ. विनोद पॉल उपस्थित आहेत. (वाचा - Second Wave of COVID-19: भारतात एप्रिलच्या मध्यावर शिगेला पोहोचेल कोरोना विषाणूचा संसर्ग; शास्त्रज्ञांनी वर्तवला धक्कादायक अंदाज)

दरम्यान, रविवारी भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 93,249 नवीन प्रकरणे नोंदली गेली असून यावर्षी एकाच दिवसात कोविड-19 प्रकरणांची सर्वाधिक नोंद झाली आहे. यासह, देशातील संक्रमणाची एकूण संख्या 1,24,85,509 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी आठ वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 19 सप्टेंबरपासून एका दिवसात कोरोना विषाणूची लागण होण्याची ही पहिलीचं वेळ आहे. 19 सप्टेंबर रोजी कोविड चे 93,337 प्रकरणे नोंदली गेली होती.

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये सलग 25 व्या दिवशी वाढ झाली आहे. देशात अद्याप 6,91,597 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जे संक्रमणाच्या एकूण प्रकरणांपैकी 5.54 आहे. लोकांचे आरोग्य सुधारण्याचे प्रमाण 93.14 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. 12 फेब्रुवारीला देशातील सर्वात कमी 1,35,926 लोकांना संसर्ग झाला होता, जे संक्रमणाच्या एकूण घटनांपैकी 1.25 टक्के होते. आकडेवारीनुसार आतापर्यंत1,16,29,289 लोक बरे झाले आहेत तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1.32 टक्के आहे.