Rs 34 cr raised via crowdfunding to secure Kerala man's release (PC - PTI)

Kerala: सौदी अरेबियात (Saudi Arabia) फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कोझिकोड (Kozhikode) येथील अब्दुल रहीम या व्यक्तीला वाचवण्यासाठी केरळचे लोक एकत्र आले आहेत. लोकांनी देणगीद्वारे 34 कोटी रुपये जमा केले आहेत. शिक्षा टाळण्यासाठी रहीमला 18 एप्रिलपूर्वी सुमारे 34 कोटी रुपये ब्लड मनी म्हणून भरावे लागतील. ब्लड मनी म्हणजे शिक्षा टाळण्यासाठी पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला पैसे द्यावे लागतात.

रहीम 18 वर्षांपासून तुरुंगात आहे. त्याच्यावर 2006 मध्ये सौदीमध्ये एका मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. स्थानिकांनी सांगितले की, 2006 मध्ये एका अपंग मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर रहीमला सौदी अरेबियामध्ये तुरुंगात टाकण्यात आले होते. मुलाच्या कुटुंबीयांनी माफी देण्यास नकार दिल्यानंतर 2018 मध्ये रहीमला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. (हेही वाचा - Indri Single Malt Indian Whisky: इंद्री सिंगल माल्ट व्हिस्कीला मिळाला जगातील आतापर्यंतची सर्वात वेगाने वाढणाऱ्या ब्रँडचा पुरस्कार)

त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. मात्र नंतर कुटुंबीयांनी रहिमला ब्लड मनी देण्याच्या अटीवर माफ करण्याचे मान्य केले. राज्यातील लोकांच्या भावनेचे कौतुक करताना मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, ही करुणा आणि सत्याची खरी केरळ कथा आहे. सौदी अरेबियात फाशीची शिक्षा भोगत असलेल्या अब्दुल रहीमची कथा या प्रतिकाराचे प्रतीक आहे, असे विजयन म्हणाले. (हेही वाचा - MEA Issues Travel Advisory For Iran-Israel: मध्यपूर्वेतील तणाव वाढला; भारताने प्रवाशांना दिला इराण, इस्रायलला प्रवास न करण्याचा सल्ला)

रहीमच्या सुटकेसाठी 34 कोटी रुपये जमा करून केरळच्या जनतेने आपली वचनबद्धता स्पष्ट केली आहे, ज्यांनी या मानवतावादी कार्यासाठी हात दिला त्या सर्वांचे आभार मानतो. एकजूट राहून आम्ही करुणा आणि सत्याची खरी केरळ कथा शेअर करत राहू, असंही पिनाराई विजयन यांनी म्हटलं आहे.