MEA Issues Travel Advisory For Iran-Israel: मध्यपूर्वेतील तणाव वाढला; भारताने प्रवाशांना दिला इराण, इस्रायलला प्रवास न करण्याचा सल्ला
S Jaishankar (PC - ANI)

MEA Issues Travel Advisory For Iran, Israel: 1 एप्रिल रोजी इराण (Iran) च्या दूतावासावर इस्रायल (Israel) ने हल्ला केल्याचा आरोप इराणने केला आहे. या हल्ल्यानंतर जगभरात युद्धाची भीती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणने 48 तासांच्या आत इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. याची माहिती मिळताच अमेरिका, रशिया, ब्रिटनसह अनेक राज्यांनी ॲडव्हायझरी (Advisory) जारी करून लोकांना प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. यानंतर आता भारतानेही लोकांना इस्रायलला न जाण्याची विनंती केली आहे.

अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि जर्मनी यांनी मध्यपूर्वेतील देशांना संयम बाळगण्यास सांगितले आहे. इस्रायल आणि इराणमधील युद्धाच्या वाढत्या धोक्यांदरम्यान रशिया आणि जर्मनीने मध्यपूर्वेतील देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. इराणने इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिल्याने संपूर्ण मध्यपूर्वेतील देश संकटात सापडले आहेत. (हेही वाचा - Pakistani Army Attack: पाकिस्तान लष्कर आणि पोलीस यांच्यात झुंज, पंजाब प्रांतातील चौकीवर हल्ल्याचा व्हिडिओ समोर)

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे इराणसोबतच्या युद्धाच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी वरिष्ठ लष्करी जनरल्सची बैठक घेणार आहेत. तसेच अमेरिकेने इराणला इस्रायल आणि अमेरिकन तळांवर हल्ले न करण्याचा इशारा दिला आहे. त्याचवेळी इस्त्रायल 24-48 तासांत थेट इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. यूएस दूतावासाने आपल्या कर्मचाऱ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत मध्य इस्रायल, जेरुसलेम किंवा बीरशेबाच्या बाहेर प्रवास करू नये, असे सांगितले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी एक अधिसूचना जारी करून भारतीयांना पुढील सूचना मिळेपर्यंत इराण आणि इस्रायलमध्ये प्रवास न करण्यास सांगितले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इस्रायलमधील हल्ल्याबाबत अनेक देशांनी असा निर्णय घेतला आहे.