Photo Credit- X

Drug Bust in Delhi: दिल्ली पोलिसांनी बुधवारी 2 ऑक्टोबर रोजी अंमली पदार्थांच्या विरोधात मोठे यश मिळवले आणि आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश केला. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 500 किलोपेक्षा जास्त वजनाचे ड्रग्ज जप्त केले आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसरा, 560 किलो पेक्षा जास्त कोकेन जप्त करण्यात आले आहे. ज्याचे बाजार मूल्य 2,000 कोटींपेक्षा जास्त आहे. एएनआयने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या हवाल्याने म्हटले आहे की, या प्रकरणात नार्को-टेरर अँगलचा तपास केला जात आहे. (हेही वाचा: iPhone 16 Pro Max: दिल्ली विमानतळावर तब्बल 26 आयफोन 16 प्रो मॅक्स फोन्ससह महिलेला अटक; जाणून घ्या काय आहे प्रकरण)

याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, आज 2 ऑक्टोबर रोजी दिल्लीत 2,000 कोटी रुपयांचे 500 किलोहून अधिक कोकेन जप्त करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्लीतील अंमली पदार्थांच्या तस्करीचा हा सर्वात मोठा पर्दाफाश आहे. याआधीही दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ड्रग्जविरोधात मोहीम राबवून अनेक ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मात्र, हे प्रकरण आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (1 ऑक्टोबर) रोजी दिल्लीतील टिळक नगर भागात दोन अफगाण नागरिकांना अटक केल्यानंतर अंमली पदार्थांच्या तस्करीची घटना उघडकीस आली आहे.