देशात पाण्याची समस्या किती भीषण झाली आहे याचे भयानक एक उदाहरण नुकतेच घडले आहे. पाण्याच्या वादावरून सासरच्या मंडळींनी चक्क आपल्या सुनेला जिवंत जाळले आहे. यामध्ये ही महिला 90 टक्के भाजली असून, सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मधील बैतुल येथील, बडोरा गावात ही घटना घडली आहे. यानंतर या कुटुंबातील 6 जण बेपत्ता झाले आहेत. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. न्यूज 18 ने याबाबत वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साहू परिवारात काही दिवसांपासून पाण्यावर वाद सुरु झाले होते. कुटुंबात जमिनीची वाटणी झाली होती. या वातानिमध्ये राजेश नावाच्या व्यक्तीच्या वाट्याला जी जमीन आली होती त्यावर सेप्टिक टँक होते, तर, दुसऱ्या कुटुंबाला जो भाग गेला होता त्यावर हँडपंप होता. याच हँडपंपच्या पाण्यावरून दोन्ही कुटुंबार वाद सुरु होते. जेव्हा पानी घ्यायची वेळ यायची तेव्हा राजेश आणि त्याच्या पत्नीला पाणी घेण्यासाठी दुसऱ्या कुटुंबातील लोक मनाई करायचे. (हेही वाचा: प्रेम प्रकरण असल्याच्या संशयातून 16 वर्षाच्या मुलीला बापाने जिवंत जाळले)
गुरुवारी राजेशची पत्नी, द्वारका जेव्हा पाणी भरण्यासाठी गेली तेव्हा याच गोष्टीवरून वाद झाला आणि कुटुंबीयांनी तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत पेटवून दिले. द्वारकाच्या किंकाळ्या ऐकून पती राजेश आणि त्यांची मुलगी बाहेर आली. द्वारका आगीत होरपळत असताना सासरची मंडळी फक्त तो तमाशा पाहत उभी होती. राजेश आणि मुलीने ताबडतोब द्वारका विझवण्याचा प्रयत्न केला आणि तिला रुग्णालयात हलवले. द्वारकाने दिलेल्या जबाबानुसार सासू-सासरे, राजेशचा भाऊ, त्याची पत्नी आणि चुलत सासू-सासरे यांच्यासहीत 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.