Karnatak Shokcer: कर्नाटकातील हसन जिल्ह्यात कान सुन्न करणारी घटना घडली आहे. एका पोलिस हवालदाराने आपल्या पत्नीची (Wife) हत्या (Murder) केली आहे. धक्कादायक म्हणजे एसपी कार्यालयाच्या परिसरात पत्नीची हत्या केली. हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला आहे. महिलेची चाकूने भोसकून हत्या केली आहे. हत्येच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. (हेही वाचा- झोपेत चालताना तरुणाचा सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू; मुंबई येथील घटना)
मिळालेल्या माहितीनुसार, ममता असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर लोकनाथ असं आरोपीचे नाव आहे. गेल्या चार दिवसांपासून दोघांंमध्ये भांडण झाले होते. त्यामुळे रागाच्या भरात त्याने हत्या केली. १७ वर्षापूर्वी दोघांचे लग्न झाले होते. मागील काही दिवसांपासून दोघेही एकमेकांशी भांडत होते. भांडणाचे कारण अद्याप समोर आले नाही. भांडणाला कंटाळून तिनं तक्रार करायचे ठरवले.
पाहा व्हिडिओ
#WATCH | Hassan, Karnataka: Husband stabs his wife with a knife at the office premises of District Superintendent of Police.
Hassan SP, Mohammad Sujitha says, "A person named Mamata was allegedly stabbed by her husband Loknath...An investigation is underway" pic.twitter.com/JNkr6pCe24
— ANI (@ANI) July 1, 2024
ममता आपल्या पतीविरोधात तक्रार देण्यासाठी एसपी कार्यालयात आली होती. त्यावेळी लोकनाथ संतापला आणि त्याने मागचा पुढचा विचार न करता ममावर चाकूने हल्ला केला. तिच्या छातीत आणि पोटात वार केला. पोलिस आणि इतर लोकांच्या उपस्थितीतच तिची हत्या केली. पोलिसांनी तात्काळ तीला रुग्णालयात दाखल केले. पंरतु डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले.
आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिस सज्ज झाले. कौटुंबिक वादाला कंटाळून हवालदाराने टोकाचे पाऊल उलचून पत्नीची हत्या केली चर्चा सुरु झाली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात शांतता पसरली आहे.