पतीच्या 'Pubg' खुळापायी पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
PUBG (Photo Credit: File Photo)

ब्लू व्हेल गेमचे भूत उतरतो न उतरतो तोच आता एका नवीन ऑनलाईन गेम ने अवघ्या तरुणाईला वेडं लावलय ते म्हणजे 'पबजी' गेमने. या पबजी गेममुळे सध्या अनेक संसार देखील उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. विशेषत: जोडप्यांमध्ये संवाद कमी झाला काही जोडप्यांमध्ये पतीला तर काहींमध्ये पत्नीला पबजीचे वेडं लागले आहे. पबजीच्या आहारी गेलेल्या पतीला कंटाळून पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदाबाद मधील हिरवाडी परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी कृष्णानगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेच्या पतीला पबजी खेळण्याचे वेड लागलं आहे. तो दिवसरात्र पबजी खेळण्यात मशगूल राहायचा. पबजीमुळे आठ वर्षांच्या मुलाकडे आणि पत्नीकडेही लक्ष द्यायचा नाही. मंगळवारी रात्रीही तो पबजी खेळण्यात मग्न होता. तेव्हा 'तो मोबाइल बाजूला ठेवा आणि मला वेळ द्या' अशी विनंती त्याच्या पत्नीने केली. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले.

हेही वाचा- अनेकांच्या मृत्यूस, घटस्फोटास जबाबदार असलेला PUBG Game ठरला जगात सर्वाधिक कमाई करणारा गेम; जाणून घ्या किती कोटी कमावले

भांडणांनंतर पतीने तिला जबर मारहाण केली. यामुळे चिडलेल्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण लगेच तिच्या सासरच्यांनी तिला वाचवलं आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. महिलेची प्रकृती स्थिर असून पोलिसांनी तिची साक्ष घेतली आहे.