भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा सुरळीत सुरु व्हावी यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळे शेअर बाजारात वेग वाढल्याचे दिसून आले. मात्र शेअर मार्केटचा वाढलेला वेग पाहता त्याचा सकारात्मक परिणाम म्युचअल फंडवर झालेला नाही. कारण ग्राहक सध्या म्युचअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापासून काही कारणामुळे दूर राहत आहेत.
असोसिएशन ऑफ म्युचअल फंड इन इंडिया यांच्या आकड्यांनुसार सातत्याने खुल्या असलेल्या इक्विटी योजनेमध्ये 6,026 करोड रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. मात्र एका ठराविक काळासाठी योजनेमधून 11 करोड रुपयांची मंजुरी मिळाली. याप्रकारे एकूण गुंतवणूक 6015 करोड रुपये झाली आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात इक्विटी आणि इक्विटी संदर्भातील काही बचच योजनांमध्ये 6,489 करोड रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात योजनेत 9,090 करोड रुपये, जुलै महिन्यात 8,092 करोड रुपयांची गुंतवणूक करण्यात आली.(SBI चे ग्राहकांना आवाहन; चुकूनही 'या' सुचनांकडे करू नका दुर्लक्ष)
मात्र सध्या ऑक्टोबर महिन्यात म्युचअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र आकडेवारीनुसार व्यवस्थापनातील मालमत्तेचे मूल्य वाढले आहे. ऑक्टोबर महिन्यात 7.9 लाख करोड रुपयांची मालमत्ता राहिली होती ती सप्टेंबर महिन्यात 7.6 लाख करोड रुपये होती. त्याचप्रमाणे म्युचअल फंड योजनेत ऑक्टोबर महिन्यात 1.33 लाख करोड रुपयांची गुंतवणूक करण्यात आली.