टेक्नोलॉजीमुळे कॉल (Call), व्हिडिओ कॉल (Video Call), ऑनलाईन बॅकिंग (Online Banking) समवेत सर्व गोष्टी अगदी सहज सोप्या झाल्या आहेत. परंतु, याचे जसे फायदे आहेत. तसे तोटे देखील आहेत. अनेकदा या टेक्नोलॉजीचा गैरवापर करत फसवणूक केली जाते. त्यामुळेच जर तुम्ही टेक्नोलॉजीचा वापर सावधगिरीने केला नाही तर मोठे नुकसानही होऊ शकते. आजकाल ऑनलाईन फसवणूकीचे (Online Fraud) प्रमाण अधिक वाढले आहे. दररोज अनेक फसवणुकीच्या घटना समोर येतात.
फ्रॉडर्स वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करत असतात. त्यामुळेच सतर्क राहणे गरजेचे आहे. अशातच एक महत्त्वपूर्ण सूचना सायबर सिक्युरिटी कडून करण्यात आली आहे. यात त्यांनी अननोन नंबर वरुन येणारे व्हिडिओ कॉल्स उचलू नका, असे सांगितले आहे. तसंच फसवणूक झाल्यास तक्रार दाखल करण्यासही संकोच करु नका, असे म्हटले आहे. (Pune Sextortion Crime: पुण्यातील तरुणाई Honey Trap च्या जाळ्यात; Nude Video फेसबुक फ्रेंड्सना पाठविण्याची धमकी, दोन गुन्हे, 150 तक्रारी दाखल)
पहा आयपीएस डॉ. मुक्तेश चंदर यांनी शेअर केलेला माहितीपर व्हिडिओ:
Never accept video call from strangers. You may fall victim to extortion racket. Caller may be a nude girl who is part of the gang trying to trap you. See this video how it happens. Do not hesitate to lodge FIR with police if you are a victim.
— Dr. Muktesh Chander, IPS (@mukteshchander) July 17, 2021
अनोळखी नंबरवरुन आलेले व्हिडिओ कॉल्स कधीही उचलू नका, असे आयपीएस डॉ. मुक्तेश चंदर यांनी आवाहन केले आहे. यामुळे तुम्ही सेक्स रॅकेटला बळी पडू शकता. सेक्सी व्हिडिओ कॉल द्वारे तुम्हाला कशाप्रकारे फसवले जाईल याचा एक व्हिडिओ देखील त्यांनी ट्विटसोबत जोडला आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या व्हिडिओ कॉलद्वारे अनेकांना फसवण्यात आले आहे. या कॉलचे रेकॉर्डिंग करुन तुम्हाला ब्लॅकमेल करण्यात येईल. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप वर अनेक प्रकारे फेक प्रोफाईल बनवून तुम्हाला फसवण्यात येईल. त्यामुळे नेहमी सावध रहा, असे आवाहन करण्यात आले आहे.