Arrest | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पश्चिम बंगालमधील (West Bengal) भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रमुख नेते सब्यसाची घोष (Sabyasachi Ghosh) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर हावडा येथे वेश्याव्यवसायाचे रॅकेट (Prostitution Racket) चालविल्याचा आरोप आहे. संदेशखाली येथील लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजप (BJP) आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) यांच्यातील तणाव वाढत असताना ही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील राजकीय संघर्ष अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, येत्या 1 आणि 2 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. शिवाय 6 मार्च रोजी ते उत्तर परगाना जिल्ह्यात महिलांच्या मेळाव्यास संबोधित करणार आहे. या पार्श्वभूमीवर ही अटक महत्त्वाची मानली जात आहे.

तृणमूल काँग्रेसची भाजपवर टीकेची झोड

पश्चिम बंगाल राज्यातील हावडा येथील सब्यसाची घोष यांच्या हॉटेल परिसरात बंगाल पोलिसांनी वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश केल्याचा आरोप आहे. त्यावरुन तृणमूल काँग्रेसने भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. तृणमूल काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत भाजप गुन्हेगारांची ढाल म्हणून काम करत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणावरुन तृणमूलने काँग्रेसचा निशेध केला आहे. टीएमसीने आपल्या अधिकृत हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये, भाजप नेते सब्यसाची घोष यांनी हावडा येथील संकरेल येथील हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलींचे वेश्याव्यवसाय रॅकेट चालवताना पकडले. पोलिसांनी 11 आरोपींना अटक केली आणि घटनास्थळावरून 6 पीडितांची सुटका केली. हा खरा भाजप आहे. जो महिला आणि मुलींचे संरक्षण करत नाही. उलट गुन्हेगारांना पाठीशी घालतो, असे म्हटले आहे. (हेही वाचा, Republic TV Journalist Arrested: संदेशखाली येथे रिपब्लिक टीव्हीशी संबंधित पत्रकाराला पश्चिम बंगाल पोलिसांकडून अटक)

भाजपकडून ममता सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न

संदेशखाली प्रकरणात भाजप तृणमूल काँग्रेस सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतानाच ही अटक झाल्याने राजकीय वातावरण कमालीचे बदलले आहे. दरम्यान, खासदार लॉकेट चॅटर्जी आणि आमदार अग्निमित्रा पॉल यांच्या नेतृत्वाखालील भाजप महिला कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेशांचा दाखला देत अशांत प्रदेशाला भेट देण्यास मनाई केली होती. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने संदेशखाली येथे मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपांची घटनास्थळी चौकशी करण्यासाठी एक पथक तैनात केले. (हेही वाचा, Derek O'Brien Suspended: राज्यसभेच्या सभापतींसोबत झालेल्या वादानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन निलंबित)

टीएमसी नेत्यांवर, विशेषत: शेख शाहजहान यांच्यावर लैंगिक शोषण आणि जमीन बळकावल्याच्या आरोप झाल्यानंतर संदेशखाली हा प्रदेश राजकीय वादात ओढळा गेला आहे. स्थानिक जिल्हा परिषदेचे सदस्य शेख शहाजहान सध्या अज्ञातवासात आहेत. त्यांच्या गायब होण्याने आरोपांना अधिकच धार आली आहे. दरम्यान, संदेशखाली प्रकरण भाजप देशभरात ताबविण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणावरुन भाजपच्या विविध नेत्यांनीही सोशल मीडियावर तीव्र टीका केली आहे.