Narendra Modi | (Photo Credit: ANII)

PM Modi Warns To Pakistan: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारताने पाकिस्तानचा बदला घेतला असून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्धवस्त केले. पाकिस्तानला प्रतिउत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) केले होते. शनिवारी या दोन्ही देशामध्ये युद्धबंदी (India Pakistan Ceasefire) झाली. परंतु, काही तासांतचं पाकिस्तानने सीमावर्ती भागात गोळीबार केला आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. मात्र आता ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच असल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितले आहे. रविवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय सुरक्षा बैठक बोलावली होती. ज्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख आणि संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान उपस्थित होते.

दरम्यान, 9 मे च्या रात्री, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. त्यांनी उपायांवर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेच्या उपाध्यक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला स्पष्टपणे संदेश देताना म्हटलं की, 'जर त्यांनी गोळीबार केला तर, आम्ही गोळे डागू.' जर पाकिस्तानने काही केले तर त्याचे प्रतिउत्तर आणखी विनाशकारी आणि कठोर असेल, असं मोदींनी स्पष्ट केलं आहे. (हेही वाचा - India-Pakistan Tensions: 'काश्मीर हा बायबलमधील 1000 वर्ष जुना संघर्ष नाही'; अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांचा मध्यस्थीचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला)

युद्धबंदीच्या घोषणेनंतर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा -

काश्मीरबाबत आमची भूमिका स्पष्ट -

यापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, काश्मीरबाबत आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे, आता फक्त एकच मुद्दा उरला आहे आणि तो म्हणजे पाकव्याप्त काश्मीर (पीओके) परत करणे. याशिवाय दुसरे काहीही नाही. आमचा इतर कोणत्याही विषयावर बोलण्याचा हेतू नाही. आम्हाला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. (हेही वाचा: India-Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान युद्धबंदीच्या घोषणेवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची प्रतिक्रिया; म्हणाले, दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही)

दोन्ही देशांमधील युद्धबंदी लागू -

शनिवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी लागू करण्यात आली होती. शनिवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून युद्धबंदी लागू झाल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले होते. परंतु पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर ते गुजरातपर्यंत दोन्ही देशांमधील आंतरराष्ट्रीय भू-सीमेवरील नियंत्रण रेषेवर गोळीबार आणि ड्रोन हल्ला केला. आता मोदींनी पाकिस्तानला आज पुन्हा कडक शब्दांत इशारा दिला आहे.