भारतात सध्या कोविड-19 (Covid-19) चे संकट अद्याप गंभीर स्वरुपात आहे. यामुळे भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांचा (Foreigners) व्हिसा (Visa) 31 ऑगस्टपर्यंत नि:शुल्क वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मार्च 2020 पासून कमर्शिअल फ्लाईट्सची (Commercial Flight) सेवा बंद केल्यामुळे अनेक परदेशी नागरिक भारतात अडकून पडले आहेत. या नागरिकांसाठी हा निर्णय घेतला असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने (Union Home Ministry) सांगितले.
कोविड-19 लॉकडाऊनदरम्यान परदेशी नागरिकांना त्यांचा व्हिसा एक्सडेंट करण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन 29 जून 2020 रोजी गृहमंत्रालयाने परदेशी नागरिकांच्या व्हिसामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. विमानसेवा सुरु झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत हा व्हिसा व्हॅलिड असेल, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. परंतु, परदेशी नागरिकांकडून दर महिन्याला व्हिसा वाढवण्याचे अर्ज वारंवार येत होते.
सध्या कोरोनाची परिस्थिती पाहात कर्मशिअल फ्लाईट्स लवकर सुरु होण्याचे चिन्ह दिसत नसल्याने मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय व्हिसा असणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांना 31 ऑगस्ट 2021 पर्यंत विनामुल्य व्हिसा वाढवून मिळणार आहे आणि यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारची पेन्लटी लागू होणार नाही, असे एका निवेदनात म्हटले आहे. (H-1B Visas: ट्रम्प प्रशासनाने एच-1 बी आणि इतर वर्क व्हिसावरील बंदी 31 मार्चपर्यंत वाढविली; अनेक भारतीय IT Professionals वर होणार परिणाम)
या सर्व परदेशी नागरिकांना FRRO आणि FRO ला कोणत्याही प्रकारचा व्हिसा वाढवण्याचा अर्ज देण्याची गरज नाही. हे सर्व परदेशी नागरिक भारतातून बाहेर जाण्यापूर्वी FRRO आणि FRO निकास परवानगी मागू शकतात. ही परवानगी देताना त्यांना कोणत्याही प्रकारची पेन्लटी लागू होणार नाही, असे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.