कुख्यात गँगस्टर विकास दुबे (Gangster Vikas Dubey) हा फरिदाबाद (Faridabad) येथून पुन्हा फरार झाला आहे. कानपूर एन्काऊंटर (Kanpur Encounter) प्रकरणानंतर उत्तर प्रदेश पोलीस (Uttar Pradesh Police) खडबडून जागे झाले आहेत. त्यांनी विकास दुबे याचा शोध सुरु केला आहे. मात्र, प्रदीर्घ काळ उलटूनही विकास दुबे पोलिसांच्या हाती अद्यापही लागला नाही. दरम्यान, फरिदाबाद येथील एका मिठाईच्या दुकानासमोरच्या फुटपातवर विकास दुबे उभा असल्याचे सीसीटीव्ही (Vikas Dubey CCTV footage) फुटेजमध्ये कैद झाले आहे. या ठिकाणाहून ऑटोरिक्षाने तो पुढे कुठे गेला हे मात्र समजू शकले नाही. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा सांगणाऱ्यांस 5 लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे.
व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, काळ्या रंगाचा टीशर्ट आणि जिन्स पॅन्ट घातलेला आणि तोंडाला मास्क असलेला विकास दुबे पाठीवर सॅक घेऊन उभा आहे. तो ऑटोरिक्षाची वाट पाहतो आहे. फरिदाबाद येथील एका मिठाई दुकानासमोर असलेल्या रत्याच्या फुटपातवर तो उभा आहे. दुकानाला सीसीटीव्ही फुटेज असलयाचे ध्यानात येताच तो तिथून बाजूला होतानाही दिसतो आहे. या ठिकाणी तो साधारण पाच मिनिटे दिसतो आहे. इथे तो ऑटोरिक्षाला हात करतो आहे. परंतू, पहिल्या दोन रिक्षांनी त्याला घेतले नाही. त्यानंतर तिसऱ्या रिक्षात बसून तो निघून गेला. (हेही वाचा, Kanpur Encounter: कुख्यात गँगस्टर विकास दुबे याची पतनी ऋचाही आता 'मोस्ट वॉन्टेड')
देखिए, जब फरीदाबाद में खुलेआम घूम रहा था गैंगस्टर विकास दुबे। पुलिस भी कुछ नहीं कर पाई और वह फुर्र हो गया। pic.twitter.com/42rhVSpFoB
— NBT Hindi News (@NavbharatTimes) July 8, 2020
प्रदीर्घ काळ उलटूनही पोलिसांना विकास दुबे याचा ठावठिकाणा अद्यापही मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांनी तपास मोहीम अधिक तीव्र केली आहे. माहित असलेल्या त्याच्या बहितांश ठिकाणांवर पोलिसांनी छापा मारला. तेथून काहींना ताब्यात घेतले आहे. तसेच, विकास दुबेच्या हस्तकांनाही पोलिसांनी अटक केली आहे. काहींचा एन्काऊंटर केला आहे. तरीही विकास दुबे पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी आता त्याचा ठावठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तिला देण्यात येणाऱ्या इनामाची रक्कम वाढवली आहे. सुरुवातील 2.5 लाख इतकी असलेली ही रक्कम आता 5 लाख रुपये इतकी वाढवली आहे.