उत्तर प्रदेश पोलीस (Uttar Pradesh Police) अद्यापही गँगस्टर विकास दुबे (Vikas Dubey) याचा तपास करत आहेत. परंतू, विकास दुबे (Richa Dubey) अद्यापही उत्तर प्रदेश पोलिसांच्या हाती लागला नाही. यूपी पोलीस विकास दुबे याच्यासोबत त्याची पत्नी ऋचा हिचाही शोध घेत आहेत. ऋचा ही विकास सोबत पळाली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी ऋचा दुबे हिचाह समावेश आता मोस्ट वॉन्डेड (Most Wanted) यादीत केला आहे. विकास दुबे याने काही दिवसांपूर्वीच कानपूर येथे आठ पोलिसांची हत्या केली आहे. त्यानंतर तो आपला मुलगा आणि पत्नी यांच्यासोबत त्याच्या बिकरु गावातील घरातून पळाला आहे.
सूत्रांचा हवाल्याने दिलेल्या वृत्तात एएनआय या वत्तसंस्थेने म्हटले आहे की, तपासादरम्यान, पोलिसांना विकासची पत्नी ऋचा हिचा फोन मिळाला आहे. या फोनद्वारे माहिती मिळाली आहे की, गावातील सीसीटीव्ही फुटेज विकासच्या पत्नीच्या फोनसोबत जोडले होते. पोलिसांच्या तपास पथकातील एका सदस्याने सांगितले की, हे स्पष्ट आहे की, ऋचा हिने गावातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सर्व परिसरावर नजर ठेवली होती. कदाचित तिने सीसीटीव्ही फुटेज डिलिट करण्यासाठी मोबाईलचा वापर केला असावा. या आधी 2017 मध्ये जेव्हा एसटीएफ द्वारा विकास दुबे याला गिरफ्तार केले होते तव्हाही तीने (ऋचा) आपल्या पतीच्या बचावासाठी सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर अपलोड केले होते. कारण तिला असे वाटत होते की तिच्या पतीचा इन्काउंटर केला जाईल.
पोलिसांनी ऋचा हिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू, अद्यापही ती मिळाली नाही. पोलिसांनी विकास आणि ऋचा यांच्या सर्व नातेवाईकांशी संपर्क साधला आहे. अद्याप दोघांचाही पत्ता लागला नाही. एका स्थानिक व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, विकासची पत्नी ऋचा ही प्रामुक्याने कानपूर येथे राहात होती. परंतू आपल्या फोनच्या माध्यमातून ती सर्व गावावर नजर ठेऊन होती. (हेही वाचा, उत्तर प्रदेश: कुख्यात विकास दुबे याला पकडण्यासाठी Intelligence Bureau यूपी पोलिसांच्या मदतीला)
याच व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर पुढे सांगितले की, नोकर आणि इतर काम करणारे सर्व लोक नेहमीच भाभीजी (ऋचा) पासून सावध असत. कारण ठराविक काळानंतर ती त्यांची तपासणी करत असे. तिने नेहमीच आपल्या पतीच्या कृत्याचे समर्थन केले आहे. तिने गावच्या महिलांशी कधीच संवाद साधला नाही. तिचे आणि गावच्या महिलांचे कधीच बोलणे होत नसे.