Vijay Mallya Bankrupt: विजय माल्या इंग्लंडच्या कोर्टाकडून दिवाळखोर जाहीर
Vijay Mallya | (Photo Credits-Facebook)

इंग्लंडच्या एका कोर्टाने (Court of England) भारताबाहेर पळालेला भारतीय उद्योगपती विजय माल्या (Vijay Mallya) याला 'दिवाळखोर' (Bankrupt) घोषीत केले आहे. दिवाळखोर विजय माल्या (Vijay Mallya Bankrupt) हे किंगफिशर एअरलाईन्स कंपनीचे चेअरमन आहेत. भारतीय स्टेट बँक (SBI) च्या नेतृत्वाखालील बँकांच्या सुमहासाठी भारत आणि विदेशातील माल्या याच्या किंगफिशर कंपनीच्या मालकीच्या संपत्ती कर्ज वसूल करण्यासाठी जप्त करण्याच्या प्रक्रियेच्या पावलापूर्वी इंग्लंडच्या कोर्टाचा निर्णय आला आहे. त्यामुळे माल्याच्या संपत्ती जप्त करुन कर्जाची थकवलेली रक्कम वसूल करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

भारतीय बँकांची बाडू मांडणारी कायदेशीर कंपनी टीएलटी एलएलपी आणि बॅरिस्टर मार्सिया शेकरडेमियन यांनी भारतीय बँकाच्या बाजूने माल्याची दिवाळखोरी जाहीर करण्याबाबत मागणी केली. 65 वर्षांचा उद्योगपती माल्या सध्या इंग्लंडमध्ये जामीनावर बाहेर आहे. सांगितले जाते आहे की, प्रत्यार्पण प्रक्रियेशी संबंधीत एका वेगळ्या प्रकरणात देशाला शरण देण्याच्या मुद्द्यावर गोपनीय कायदेशीर कारवाईबाबत चर्चा होऊन मार्ग निघेपर्यंत तो तिथे जामीनावर राहू शकतो.

माल्याचे वकील फिलीप मार्शल यांनी या प्रकरणात आदेश स्थगित करावा अशी मागणी केली होती. दरम्यान, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. ही मागणी फेटाळून लावत न्यायालयाने म्हटले की, माल्या यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे योग्य असे पुरावे नाहीत. जेणेकरुन याचिकाकर्त्यांना त्यांचे पैसे योग्य वेळेत परत केले जातील. (हेही वाचा, Vijay Mallya, Nirav Modi, Mehul Choksi Assets: विजय माल्या, निरव मोदी, मोहुल चौक्सी यांच्यावर ED ची कारवाई; 9,371 कोटी रुपयांची संपत्ती बँकांकडे हस्तांतरीत)

दरम्यान, दिवाळखोरी आदेशाविरोधात दाद मागण्यासाठी माल्या याच्या वकीलाने एक निवेदनही न्यायालयाला सादर केले. मात्र, ' या अपिलामध्ये कोणतीही वास्तवाता नाही 'असे सांगत न्यायमूर्ती ब्रिग्ज यांनी हे निवेदनही फेटाळून लावले.