Air India Plane Crash | Twitter)

Air India plane Crash Update: अहमदाबादमधील विमान अपघाताच्या (Ahmedabad Plane Crash) घटनेबाबत अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमानातील (Air India plane) एकही प्रवासी वाचला नाही. विमानातील सर्व 242 जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात 242 प्रवासी होते, ज्यात पायलट आणि क्रू मेंबर्सचा समावेश होता. यापैकी 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते. या सर्वाचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे.

गुजरात आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव धनंजय द्विवेदी यांनी अहमदाबाद विमान अपघाताबाबत एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे वसतिगृह, कर्मचारी निवासस्थान आणि इतर निवासी क्षेत्रे जिथे विमान कोसळले त्या भागातील अनेक लोक जखमी झाले आहेत. सुमारे 50 जखमींना अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (हेही वाचा - Vijay Rupani: एअर इंडियाच्या AI171 विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी प्रवासी असल्याचे वृत्त)

वृत्तानुसार, एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात कोसळले. अपघातानंतर परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. वृत्तांमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील याच विमानात होते. (हेही वाचा - Air India Plane Crash: अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कसे कोसळले? समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ)

घटनास्थळी बचावकार्य -

दरम्यान, अपघातानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तीन पथकांना गांधीनगरहून विमान अपघातस्थळी हलवण्यात आले आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, वडोदराहून आणखी तीन पथके हलवण्यात येत आहेत.